बारड /प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील बारड येथिल कोंडाबाई वामनराव बागडे शेतातील कामावरुन घराकडे परत आली नसल्याने बेपत्ता महिलेचा शोध लागत नसुन नातेवाईक अस्वस्थ झाले आहेत.
कोंडाबाई वामनराव वागडे वय (६५) ता : ९ ( बुधवार) दररोजच्या प्रमाणे शेतात काम करण्यासाठी घरुन गेल्या होत्या यानंतर घराकडे पुन्हा परतल्या नसल्याने कुटुंबांने गावातील परीसरात शोध घेतला जवळील सर्व नातेवाईकांकडे चौकशी केली परंतु शोध काही लागला नाही यानंतर कुटुंबाने पोलिसांकडे धाव घेवून कोंडाबाई बागडे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बागडे परिवाराने सार्वजनिक ठिकाणी शोध घेतला परंतु कुठेही ठावठिकाणा लागला नाही
कोंडाबाई बागडे यांची उंची पाच फुट दोन इंच वर्ण काळा अंगावर हिरव्या रंगाचे चिट्याचे लुगडे नेसलेली आहे बोली भाषा मराठी असुन तेलगू भाषेचे ज्ञान अवगत आहे.
याबाबत सदर सदरिल महीला कुणाला आढल्यास किंवा दीसल्यास याबाबत बारड ठाण्यात संपर्क साधनांचा आवहान यावेळी बारड ठाण्याचे सह्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी केले आहे .
मो नं ९३०९७४०७२३ , ९९२२३७३०३८,९९७५०९७०६९,९०२१७९०५९८

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा