बारड बीटस्तरीय ऑनलाईन शिक्षण सुसंवाद कार्यशाळा.

बारड / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या आँनलाईन शिक्षण उपक्रमा अंतर्गत शिक्षण आपल्या दारी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यासाठी बारड बीटस्तरीय शिक्षकांनची आँनलाईन शिक्षण पध्दतीबाबतीत शिक्षणविस्तार अधिकारी सुधीर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आँनलाईन बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.यावेळी पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या बैठकीला १६७शिक्षकांनी सहभागी होऊन शिक्षण पद्धती जानुन घेतली आहे.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,जि.प. शिक्षण विभाग, गटसाधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बीटस्तरीय ऑनलाईन शिक्षण संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी व्यंकटराव पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शिक्षकांची *संवाद कार्यशाळा* घेण्याचा हेतू व सद्यस्थितीतील गरज, आँनलाईन शिक्षण पध्दत उपयुक्तता याबाबत सखोल माहीती दिली आहे. .
कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात ऑनलाइन - ऑफलाइन पद्धतीने शिक्षण कसे द्यावे याची कार्यपद्धती बाबत चर्चा यावेळी करण्यात आली तर शिक्षकांनी केलेल्या कामाची दखल घेण्यात आली आहे.
प्राचार्य डायट डाॕ.रविंद्र अंबेकर यांनी प्रस्तुत कार्य शाळेला उपस्थित राहून शिक्षकांना यावेळी मार्गदर्शनात या कार्यशाळेच्या माध्यमातून शिक्षकांनी राबवित असलेल्या चांगल्या उपक्रमाचे सादरीकरण करावे, शाळा बंद पण शिक्षण चालू....... या उपक्रमांतर्गत दैनंदिन अभ्यासमाला व त्यातून आॕनलाइन -आफलाइन शिक्षण कसे चालू पाहीजे. तसेच शैक्षणिक दिनदर्शिका माहे सप्टेंबर ते नोव्हेंबर उपलब्ध झाल्या असुन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी.
शाळा बंद - पण शिक्षण आहे...... याअभ्यासमालेतील कन्टेन्ट शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शेअर केला पाहिजे, हा कन्टेन्ट वापरून विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू आहे असे म्हणता येईल, दैनंदिन अभ्यासमाला शेअर केल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला याचे फीडबॅक/ प्रत्याभरण शिक्षकांनी घ्यावा.या बीटस्तरीय ऑनलाइन कार्यशाळेतून पर्यवेक्षकीय यंत्रणा एका व्यासपीठावर आल्यामुळे शिक्षकांना एक दिशा मिळेल. दीक्षा ॲप वरील कन्टेन्ट हा दर्जेदार व सर्टिफाइड आहे शिक्षक मित्र व विद्यार्थी मित्र या संकल्पनेची अंमलबजावणी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून करण्यात यावी. विद्यार्थी शिक्षणासाठी आज समाजाच्या मदतीचीही खूप गरज निर्माण झाली आहे. असे सविस्तर माहिती यावेळी सांगितली आह ज्येष्ट अधिव्याख्याता डायट चिटकूलवार यांनी शाळा बंद पण शिक्षण चालू आहे ही दैनंदिन अभ्यासमाला प्रत्येक मुलांपर्यंत गेली पाहिजे.त्यावर शिक्षकांनचे लक्ष असले पाहिजे तर शिक्षक संतोष तिम्मापूरे यांच्या स्वाध्याय पुस्तिकेवर प्रकाश टाकला आहे. ही पुस्तिका प्रत्येक विद्यार्थ्यांना मिळण्यासा पाठपुरावा करून मिळूवून देणार असल्याचे सांगितले.काही ठिकाणी Google मीटिंग ॲपचा वापर करून *व्हर्च्युअल क्लासरूम च्या* माध्यमातून आपल्या बीटमधील विद्यार्थ्यांचे शिक्षण होत आहे यात साधारपणे आज ४०% विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इतर ६०% विद्यार्थ्यांसाठी आॕफलाइने *स्वाध्यायपुस्तिका व शिक्षक मित्र* च्या माध्यमातून सुशिक्षित युवकांनच्या मदतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जावेण.इतर व्हीडिओ आपल्या साहित्या पेक्षा *दिक्षा अॕप* च्या माध्यामातून शिक्षण चालू ठेवावे असे यावेळी मार्गदर्शन शिक्षकांना करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी व्यापक प्रमाणात *शिक्षक मित्र मोहीम* राबविण्याची कार्यवाही सुरू असल्याचे केंद्रप्रमुख भिसे यांनी सांगितले.तर शिक्षक चव्हाण यांनी *टिलीमीली*या कार्यक्रम बाबत माहीती दिली.शिक्षक लाडके यांनी *बालरक्षक* या बाबत संपूर्ण माहीती दिली.
बारड बीट येथील शिक्षक साईनाथ सुत्रावे ,पाटील जी.पी., संतोष तिम्मापूरे , शिक्षीका छाया मॕडम, शेवाळकर यांनी मनोगतातून बोलक्या प्रतिक्रिया दिल्या. शाळा स्तरावर शिक्षण कसे चालू आहे. याची माहीती दिलीआहे
आँनलाईन कार्यशाळा कार्यक्रम प्रस्ताविक गटशिक्षण अधिकारी व्यंकटराव पाटील यांनी केले तर प्रशासनाच्या वतीने बारड बीटचे केंद्रप्रमुख अरुण अतनुरे यांनी आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा