पशुपालकांची चिंता वाढली.
![]() |
| लक्षणे :- पशुवैद्यकीय दवाखान्यात आलेल्या लहान जनावराच्या अंगावर गाठीची लक्षणे आढळून येत आहेत. |
मुगट / प्रतिनिधी
मुगट व परिसरातील अनेक गावांमध्ये जनावरांना लंम्पी या स्किन डिसीज चा प्रादुर्भाव अनेक खेड्यात आढळून येत आहे. त्यामुळे पशुपालक चिंताग्रस्त झाली आहेत. मुगट येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक जनावरे तपासणीसाठी येत आहेत. जवळपास पाच ते सहा गावांसाठी मुगट येथील एकच दवाखाना आहे.
लंबी हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे त्याला रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागा पुढे मोठे आव्हान निर्माण होऊ शकते.
खेड्यापाड्यातील अनेक गावातील जनावरांच्या अंगावर गाठी , जनावराला ताप येणे, नाक व डोळ्यातून पाणी येणे . ही लक्षणे दिसून आली तर त्या जनावरास लंबी हा विषाणूजन्य रोगाची लागन झाली असे दिसून येते. तो संसर्गजन्य असल्यामुळे या बाधित जनावरांना इतर जनावराच्या सहवासात ठेवणे धोक्याची निर्माण होऊ शकते .
या आजाराचा संसर्ग प्रसार मुख्यत्वे डास, माशा, गोचीड व जनावरांचा एकमेकांना स्पर्श यामधून होत असतो. त्यामुळे बाधित झालेल्या जनावरांना इतर जनावरांपासून वेगळे ठेवणे वेगळा चारापाणी सुद्धा वेगळे ठेवणे. या उपायोजना चे कटाक्षाने पालन केले तर या चर्म रोगापासून आपण आपल्या पशूंना वाचू शकतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा