संपादक आशिष मुगटकर
![]() |
| मार्गदर्शन :- वंचित बहुजन आघाडीचे ॲड. कमलेश चौंदते मुदखेड नगर परिषद येथे आयोजित लोटांगण आंदोलनात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना. |
अतीक अहमद मुदखेड तालुका/ शहर प्रतिनिधी
शहराच्या लुम्बिनी नगर येथील बौद्ध विहाराचे अपूर्णकाम मार्गी लावणे; वाचनालय, धार्मिक स्थळे, आठवडी बाजार सुरू करणे, ऑटो रिक्शा चालवण्यास परवानगी देणे; नवी आबादी, अशोका नगर व इतर भागातील बंद असलेले रस्ते व नाल्याचे काम पूर्ण करणे अश्या नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कार्यरतत्पर नगरसेवक ॲड.कमलेश चौदंते यांच्या पुढाकाराने न.प.समोर लोटांगण आंदोलन करण्यात आले.
या लोटांगण आंदोलना दरम्यान उपस्थितांना प्रभावित करणारे मनोगत नगरसेवक ॲड.कमलेश चौदंते, ॲड.माधव हाटकर मुगटकर यांनी व्यक्त केले. कार्यकर्त्यांनी आपल्या घोषणांनी न.प.परिसर दणाणून सोडला.
यानिमित्ताने न.प.चे मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना सदर मागण्यांचे निवेदनही देण्यात आले. यावेळी केशव मुद्देवाड, सुरज हणमंते यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. प्रशासनास दिलेल्या निवेदनावर वंबआचे तालुकाध्यक्ष गंगाधर पा.पवार निवघेकर, राहुल उर्फ अप्पा चौदंते, बाळू राऊत, गोविंद बामणे, ओमकार चव्हाण, केदार शेवटे, बालजी काटकर, सुनील गायकवाड, मोहन यादव आदींच्या स्वाक्षऱ्या नमूद आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा