इयत्ता बारावी बोर्ड परिक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांनीच्या हस्ते ध्वजारोहन.

ध्वजारोहण :- बारावी बोर्ड २०२० परिक्षेत गुणवंत विद्यार्थीनी कू.ज्योती किशनराव नादरे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सोबत शाळेतील शिक्षक उपस्थित होते.
बारड / प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील बारड येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ बारड ता मुदखेड संचलीत श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय व स्वा. से. राजाराम बापू माध्यमीक शाळा बारड यांच्या सयुक्त विद्यमाने एका अनोख्या उपक्रमाने आज ७२ वा मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन साजरा करण्यात आला, यावेळी संस्थेच्या वतीने प्रमूख पाहुणे म्हणून इयत्ता बारावी बोर्ड २०२० परिक्षेत गुणवंत विद्यार्थीनी कू.ज्योती किशनराव नादरे हिच्या हस्ते स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्वजारोहन करण्यात आले व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला,
यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष कू. ज्योती नादरेच्या हस्ते वर्षभर शाळेला सेवा देणारे शाळेचे तत्पर सेवक सयाजी कानगुले,सौ कमलबाई आठवले,शिवप्रसाद बलदवा आणि शिवराज नरवाडे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजयराव देशमुख बारडकर ,उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन,सचिव रामेश्वर कोरबनवाड, सहसचिव अशोकराव गव्हाणे दिलीपराव दुर्गे,नवनाथराव देशमुख,गौतम आठवले प्राचार्य हेमंत इंगळे,मुख्याध्यापक रामकिशन चुब्बेवार गावतील पालक व शाळा ,कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कु.गोवंदे तर आभार चुब्बेवार सर यांनी मांडले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा