शिक्षक दीना निमित्य बारड बिटचा अभिनव उपक्रम !
![]() | |
|
बारड / प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील बारड बिट अंतर्गत कोरोना संकटात "शाळा बंद शिक्षण चालू " या उपक्रमात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकाचा शेंबोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गौरव करण्यात आला आहे. यावेळी प्रथम शिक्षक दिनानिमित्त डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
शिक्षणविस्तार अधिकारी सुधीर गुट्टे,सरपंच बाळासाहेब देशमुख, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा केंद्रप्रमुख अरुण अतनुरे, केंद्रीय मुख्याध्यापक संजय माहुरकर यांच्या संकल्पनेतून विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
![]() |
कोरोना काळातील प्रतिकूल परिस्थितीतही संपूर्ण विद्यार्थी विकासाच्या ध्यासातून शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमात सक्रिय राहून विद्यादानाचे पवित्र कार्य करत असल्याबद्दल शेबोंली जि.प.प्रा.शाळा चे पदोन्नत मुख्याध्यापक लक्ष्मण दत्ताराम शिंदे यांना शिक्षक दिनी शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले आहे.
यावेळी केंद्रप्रमुख अरुण अतनुरे, शा. व्य. समितीचे अध्यक्ष बालाजी कल्याणकर, शिक्षक नेते शिवाजी भगनुरे, चंपत मुन्नेश्वर, रामकृष्ण लोखंडे, शामला महाजन, गोविंद गोरेवाड आदी उपस्तिथ होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनी कु. आदिती हीने केले तर आभार विद्यार्थ्यांनी कु. अक्षरा गोरेवाड यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा