मुदखेड तालुका प्रतिनिधी
मनिपुर राज्यात दोन महिला यांची निर्वस्त्र धिंड समुहाच्या माध्यमातुन काढल्या च्या निषेध म्हणून मुदखेड तालुक्यातील माजी सैनिक संघटना व सैनिक फॅडरेशन च्या माध्यमातुन सेवानिवृत्त सैनिक संघटनेचे प्रमुख पदाधिकारी यांच्या माध्यमातून मुदखेड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तहसीलदार मार्फत वरील निवेदन राष्ट्रपती महोदय व प्रधानमंत्री महोदय यांना पाठवण्याची विनंती करण्यात आली.
सैनिक फेडरेशन मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे राजाराम हळदे सुनील चौदंते संजय चव्हाण शशिकांत मोडवान प्रभू घोंगडे विद्याधर तहकीक साहेबराव वने विकास बलफेवाड देवराव चौदंते मारुती गुंठे देविदास पवार बालाजी गव्हाणे विद्याधर तहकीक साईनाथ राठोड व इतर सैनिक मोठ्या प्रमाणात तहसील कार्यालय मुदखेड येथे निषेध नोंदवण्यासाठी उपस्थित होते.
मणिपूर येथील दोन महिलांची नग्न अवस्थेत जे धिंड काढले त्यात एक सेवानिवृत्त माजी सैनिक यांची पत्नी असून संबंधित स्थानिक प्रशासन सैनिकाच्या बाबतीत जर असा विचार करत असेल तर देशाची रक्षा सैनिकांनी का करावी असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.
संबंधित समूहातील धिंड काढणाऱ्या सर्वांना पकडून ताबडतोब फासावर लटका व तेथील राज्य सरकार बरखास्त करून संबंधित दोन्ही महिलांना अब्रू नुकसानीचा भरपाई म्हणून प्रत्येकी ५०लाख रुपये केंद्र सरकारने द्यावे अशी विनंती मुदखेड तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने देशाचे राष्ट्रपती महोदय व प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेब यांना करण्यात आली आहे.
संबंधित गुन्हेगारांना मग तो कोणत्याही जाती धर्माचा या पक्षाचा असो त्याला ताबडतोब शासन झाल पाहिजे हीच मागणी आम्ही केलेली असून सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जर अशा घटनाची दखल घ्यावी लागत असेल तर हे केंद्र सरकार चे अपयेश आहे व तो लोकशाही व व्यक्ती स्वातंत्राचा अपमान आहे.सत्ताधारी म्हणून राज्य व केंद्र सरकार यांचे अपयेश आहे असेच म्हणावे लागेल .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा