नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नांदेड जिल्हयात अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाची हिमायतनगर तालुका पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रम दिनांक 30 जुलै रोजी उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेश संपर्क प्रमुख मनोज कमटे, प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा अध्यक्ष शुद्धोधन हनमते,नांदेड जिल्हा महासचिव आशिष पाटील कल्याणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी आलेल्या अतिथीचे स्वागत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी श्रीफळ, पुष्पहार घालून करण्यात आले.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना नांदेड शाखा हिमायतनगर कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
यावेळी हिमायतनगर तालुका अध्यक्ष देवानंद गुंडेकर, तालुका महासचिव गणपत नाचरे, तालुका उपाध्यक्ष विजय वाठोरे, तर शहर अध्यक्षपदी अनिल नाईक यांची नियुक्ती प्रदेश संपर्क मनोज कामटे, जिल्हाध्यक्ष शुद्धोधन हनवते, जिल्हा महासचिव आशिष कल्याणे पाटील यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले.
यावेळी मोठ्या संख्येने हिमायतनगर तालुक्यातील अनेक पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. नांदेड जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा विस्तार जोमाने होत आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख, प्रदेश प्रवक्ते रविंद्र मेंढे यांनी हिमायतनगर तालुका नवनिर्वाचित अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा