प्रतिनिधी हदगाव (भगवान देशमुख)
दत्ता पाटील हडसणीकर हे मागील ११ दिवसापासून मराठा समाजास ओबीसी मधून ५० टक्के च्या आत आरक्षण व विविध मागण्या करीता मौजे हडसणी तालुका हदगाव येथे आमरण उपोषणाला बसले आहेत , त्यांनी आज प्रर्यंत मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या संवैधानिक पद्धतीने आंदोलने केली आहेत , पण त्यांच्या व समाजाच्या पदरी कायम निराशा आली आहे. वैधकीय अहवालानुसार दत्ता पाटील यांची प्रकृती खालावत असुन त्यांना काल विष्णुपुरी नांदेड येथे शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांनी रुग्णालयात सुद्धा आपले आमरण उपोषण सुरू ठेवले आहे.
आज शासकीय विश्राम गृह हदगाव येथे सकल मराठा समाजा तर्फे दत्ता पाटील यांच्या उपोषणा बाबत बैठक आयोजित केली होती त्या बैठकी मध्ये सर्वानुमते दि . १६-०७-२०२३ प्रर्यंत शासनाने व सरकारने या आमरण उपोषणाची दखल घेऊन तातडीने त्यांच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा दि.१७-०७-२०२३ रोज सोमवारी हदगाव तालुका सकल मराठा समाजा तर्फे कडकडीत बंद ठेवण्यात येईल असे सर्व समाज बांधवांनी एकमताने ठरवीले आहे,
त्या अनुषंगाने आज सकल मराठा समाजातर्फे त्या आशयाचे निवेदन हदगाव तहसील प्रशासनास दिले.
यावेळी प्रमुख उपस्थितीत राजकुमार भुसारे, अविनाश पाटील हरडफकर , राजु पाटील कोथळेकर, शिवाजी पाटील हरडफकर, राजू पाटील हडसणीकर प्रल्हाद पाटील हडसणीकर संदेश पाटील हडसणीकर सचिन पाटील देवराय शरद पाटील हरडफकर, रवी पाटील सूर्यवंशी, एकनाथ पाटील सूर्यवंशी, किशोर पाटील कदम, दिनेश पाटील वडगावकर, व ईतर असंख्य मराठा बांधव उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा