हदगाव प्रतिनिधी (भगवान देशमुख)
हदगाव - हडसणी ता हदगांव येथे मागील ७ दिवसापासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण , कोर्पडी ताईच्या नराधामाला तात्काळ शिक्षा व मराठा समाजाच्या विविध मागणी करीता उपोषणाला बसलेले दत्ता पाटील हडसणीकर यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.गिरीश भाऊ जाधव , उपाध्यक्ष रामेश्वर काकडे , छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे गजानन भाऊ कहाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज हडसणी येथे दत्ता पाटलांच्या उपोषण स्थळी जाऊन तब्येतीची विचारपूस करून त्यांच्या उपोषणाला छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड तर्फे पाठिंबा देण्यात आला.
या वेळी प्रदेश प्रवक्ते अँड.दिंगाबर देशमुख व प्रदेश संघटक राजकुमार भुसारे , माजी शहर प्रमुख बजरंग भरकड , गजानन दळवी , अमोल वानखेडे ईत्यादी समाज बांधव उपस्थित होते. आझाद मैदान मुंबई येथे केलेलं आमरण उपोषण असो की हदगाव ते मुंबई अशी ७००-८०० कि.मीटरची पायी वारी हे सर्व मराठा समाजासाठी केलेल्या दत्ता पाटील यांच्या पदरी शिंदे सरकार कडून आश्वासना शिवाय दुसरे ठोस असे काही ही हाती न पडल्यामुळे त्यांनी पुन्हा उपोषनाचा मार्गाचा अवलंब केला आहे.
उपोषणाला ७ दिवस उलटून गेले आहेत तरीही आयाराम गयाराम यांची खोगीर भरती करण्यात व्यस्त आसलेल्या शिंदे सरकारकडून अद्याप पर्यंत अजून कोणताही ठोस निर्णय घेतला गेला नाही असे दत्ता पाटलांन कडून सांगण्यात आले.
दत्ता पाटील यांची तब्बेत दिवसेंदिवस खालावत आहे, जर दुर्दैवाने काही विपरीत घडले तर होणाऱ्या परिणामांची संपुर्ण जबाबदारी ही सरकारची राहील त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढून मराठा समाजाला व दत्ता पाटलांना न्याय देण्याचे कार्य या राज्य सरकारने करावे. दत्ता पाटील यांच्या मागण्या तातडीने मंजूर करून दत्ता पाटलांच्या मागण्यांची तात्काळ दखल घेऊन लवकरात लवकर योग्य तो न्याय द्यावा अन्यथा सकल मराठा समाज व छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असे प्रदेश संघटक राजकुमार भुसारे यांनी या वेळी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा