मुदखेड / तालुका प्रतिनिधी
सौ.के.एस.के.(काकू) कृषी महाविद्यालयाचे कृषीदुत मारोती रूक्माजी जाधव हे मुदखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन करणार असुन नुकतेच त्यांनी माहिती संकलन करण्यासाठी महाटी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला.
बीड जिल्ह्यातील सौ.के.एस.के.(काकू) कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी मारोती रूक्माजी जाधव यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत ग्रामीण जागरुकता कार्यानुभव
कार्यक्रम अंतर्गत सन २०२१-२०२२ या वर्षासाठी शेतकऱ्यांना शेती विषयक विविध घटकांन वर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.त्यात बीज प्रक्रिया,आळंबी उत्पादन, जलसिंचन, पशुधन बद्दल सविस्तर माहिती देणार आहेत.
यावेळी महाटीचे ग्रामसेवक एस.व्ही.श्रीनेवार,सरपंच बळी पा.ढगे,उपसरपंच तुकाराम तोटकुलवार आणि शेतकरी बांधव बालाजी पा.ढगे, मारोती ढगे,माधव ढगे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा