वीज पडून, पुरात वाहून मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला शासनाकडून आर्थिक मदत

 आपत्ती व्यवस्थापन विभागा कडून मृत व्यक्तीच्या कुटूंबाला ४ लक्ष तर जखमींना ४३००/- चा धनादेशाचे वाटप 

संपादक आशिष मुगटकर



मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

                 मुदखेड तालुक्यातील  मुगट जिल्हा गटातील मुगट येथील लक्ष्मीबाई बालाजी वर्षेवार नावाच्या महिलेचा मे महिन्यात विज पडून मृत्यू झाला होता.तर याच गावातील शेतकरी दत्ता जळबा ढेपाळे यांचा सुध्दा जुलै महिन्यात विज पडून मृत्यू झाला.माळकौठा येथील लोकडेश्वर शिंदे या युवकाचा नदीला आलेल्या अचानक पुरामुळे पुरात वाहुन मृत्यू झाला होता.या मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबातील वारसांना आर्थिक मदत शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत देण्यात आली.

 लक्ष्मीबाई वर्षेवार रा.मुगट, दत्ता ढेपाळे रा.मुगट, आणि लोकडेश्वर शिंदे रा.माळकौठा यांच्या वारसांना ४ लक्ष रुपयाचा धनादेश तर विज पडून जखमी झालेल्या महिलांना ४३००/- धनादेश  राजेंद्र खंदारे (उपविभागीय अधिकारी भोकर ), दिनेश झांपले (तहसीलदार मुदखेड) गोविंदराव शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषद सदस्या सौ अरुणाताई कल्याणे यांच्या हस्ते देण्यात आला .


                   


 यावेळी उपविभागीय अधिकारी भोकर राजेंद्र खंदारे, तहसीलदार दिनेश झांपले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा कांग्रेसचे जिल्हा अध्यक्ष गोविंदराव पा. शिंदे नागेलीकर, जिल्हा परिषद सदस्या सौ अरुणाताई कल्याणे, पंचायत समिती सदस्या सौ सुमित्राताई कांजाळकर, संचालक भिमराव पा कल्याणे,नायब तहसीलदार संजय नागमवाड, पिंटू पा. वासरीकर,मंडळ अधिकारी बालाजी कुराडे, तलाठी अर्पना देशपांडे, माधवराव पा.कल्याणे, माणिकराव जाधव, मारोती जाधव, रमेश पा कल्याणे, विलास हाटकर, शहाजी शिंदे,लोकडोजी गोणेवाड, दत्ताराम जाधव, चेअरमन माधवराव पा. कल्याणे यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या