मुदखेड / तालुका प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील निवघा व खांबाळा येथे लोकशाहीर, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती स्पर्धा परीक्षा घेवून साजरी करण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये अभिरुची वाढावी.याबरोबरच विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत टिकावेत म्हणून कै.नरबाजी संभाजी पवार सेवाभावी संस्थेच्या वतीने या स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
निवघा येथे इ. ५ वी ते १० वी अभ्यासक्रमावर आधारित गणित विषयाची स्पर्धा परीक्षा तर खांबाळा येथे इ.८ वी ते १० वी अभ्यासक्रमावर आधारित इंग्रजी विषयाची स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
कोरोनाचे सर्व नियम पाळून ही परीक्षा घेण्यात आली.यावेळी संस्थापक अध्यक्ष प्रा.संदिप पवार सर,सचिव संकेत पवार,सौ.वर्षा पवार मॕडम,सौ.संजीवनी पवार मॕडम आदींची उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा