मुगट / प्रतिनिधी
मुगट येथील ग्रामपंचायत कार्यालयात साहित्य रत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती तर थोर जहाल मतवादी नेते, क्रांतीकारक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
गावचे सरपंच प्रतिनिधी धोंडीबा वंजे, संचालक तथा उपसरपंच प्रतिनिधी भिमराव पा कल्याणे, मंडळ अधिकारी बालाजी कुराडे, तलाठी अर्पना देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती साजरी करण्यात आली.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य तातेराव हातागळे,धाराजी पवार, विलास कल्याणे, बालाजी कल्याणे, चेअरमन माधवराव पा कल्याणे, साईनाथ पांचाळ, सेहवाग कल्याणे, अनिल कुलकर्णी,चंपती कल्याणे, तुकाराम हाटकर व गावातील युवक यांची यावेळी उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा