कंधार तालुका प्रतिनिधी / साईनाथ कळवणे
कंधार तालुक्यातील कौठा येथील कै.शिवराजजी देशमुख कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता १२ वी चा निकाल १००% लागला आहे.त्यात अनेक विद्यार्थीनी घवघवीत यश संपादन करुन उत्तीर्ण झाले आहेत . यावर्षी सुध्दा विज्ञान,कला,या शाखेतून चांगले गुण मिळवून विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
त्यात विज्ञान शाखेतून कु संजना संतोष मोरलवार ही ९५% घेऊन प्रथम व कु अनुजा संजय कंधारे ९३%द्वितीय व कु राशी शिवकुमार देशमुख ९२%गुण मिळाले आहेत तसेच कला शाखा मधून ९२%प्रथम रुबिना महेबुब शेख व वाढवणे निरंजन यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.
उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा राजकुमारी शिवराज देशमुख ,उपाध्यक्षा अर्चनाताई शिवकुमार देशमुख, सचिव शिवकुमार शिवराज देशमुख, प्राचार्य संजय धुमाळे यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयीन ,प्रा संतोष नकाते,प्रा अरविंद येवतीकर ,प्रा रमेश राठोड ,सौ पांडागळे मॅडम ,पाटील मॅडम ,पालिमकर बी. ए ,वाघमारे व्ही. एम ,देशमुख बी. डी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन केले.
मातृभूमी न्युज नेटवर्क कडून इयत्ता १२वीच्या परिक्षेत यश संपादन केल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙏🙏



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा