![]() |
| जयंती :-हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती साजरी करताना मुख्याध्यापक राठोड टि.टी, उपमुख्याध्यापक नेव्हल एस.एस. यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी . |
नांदेड/ जिल्हा प्रतिनिधी
दि.१ रोजी हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून शाळेत साजरी करण्यात आली.
नेरली ( पासदगाव) ता.जि.नांदेड येथील थावराजी प्राथमिक आश्रमशाळेत हरित क्रांतीचे जनक तथा महाराष्ट्र चे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राठोड टि . टि. यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपमुख्याध्यापक नेव्हल एस.एस. यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुध्दा प्रतिमा पुजन करून अभिवादन केले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक राठोड टि.टी, उपमुख्याध्यापक नेव्हल एस.एस. यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा