मुलाची आत्महत्येची बातमी कळताच वडीलांना आला हृदय विकाराचा झटका.
बारड/ प्रतिनिधी
मुदखेड तालुक्यातील धनज येथील रहीवाशी असलेले शेतकरी हनुमंत संतोबा महाशेट्टे वय ५० वर्ष यांनी सतत ची नापिकी तसेच कर्ज बाजारी पनाला कंटाळुण स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडा गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
भारतीय स्टेट बँक कडून महाशेट्टे यांनी कर्ज घेतले होते. सततच्या निसर्गाच्या लहरी पणामुळे व नापीकी अशा ओढावलेल्या संकटामुळे कर्ज कसे फेडावे या चिंतेत राहून अखेर शेतातील धुऱ्या वरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन महाशेट्टे यांनी आपले जीवन संपवले आहे.
तर दुसरीकडे या घटनेची माहिती मिळताच त्याचे वडील संतोबा माहाशेटे यांना हृदय विकाराचा झटका आल्याची माहिती गावातील नागरिकांनी सांगितली आहे.
त्यांच्या पच्छात पत्नी एक मुलगी व दोन मुले असा परिवार आहे.
खबर देणार पिराजी महाशेट्टे यांच्या फीर्यादी वरुन बारड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
पुढील तपास सह्यक पोलीस निरीक्षक शिवराज तुगावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वानोळे तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा