मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहमद
मुदखेड जिल्हा परिषद कन्या शाळा येथे शिक्षक या पदावर असलेले शेख मुजीब मैनोद्दीन ३१ मे २०२१ रोजी आपल्या शिक्षण सेवेतून निवृत्त झाले परंतू काही तांत्रिक कारणास्तव निरोप समारंभ दिनांक ३० जून २०२१ रोजी शहरातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेत शेख मुजीब मैनोद्दीन यांना सत्कार करत निरोप देण्यात आले
या वेळी केंद्रीय शाळेचे संकुलन केंद्रीय मुख्याध्यापक रत्नाकर मूंगल, जिल्हा परिषद मुलांची शाळेचे मुख्याध्यापक बलदवा, जिल्हा परिषद कन्या शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र अडाने आदींनी शेख मुजीब मैनोद्दीन यांचा सत्कार करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि शेख यांच्या शैक्षणिक कार्याची आठवण करून देत निरोप दिलं
शेख मुजीब मैनोद्दीन यांची नियुक्ती १९९३ मध्ये भोकर तालुक्यातील जांभळी येथे नियुक्ती झाली, व तसेच बाचुटी कॅम्प येथे विद्यार्थांना शिक्षण दिले.
शैक्षणिक क्षेत्रात कार्य करत उमरी तालूक्यातील शिंदी येथे सेवा केली आणि शेवटी मुदखेड तालुका येथे बदली होऊन आणि सेवा निवृत्त झाली या निरोप कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय शाळेचे संकुलन केंद्रीय मुख्याध्यापक रत्नाकर मूंगल , प्रमुख पाहुणे शेख जावेद सर, पत्रकार शेख जब्बार, नामदेव बीचेवार,शेख इरफान,अब्दुल रझाक, अतिख अहेमद, मोहम्मद हकीम यांची होते या वेळी कलेपवार सर, येवतीकर सर, पी जी मंतेवाड, शेख अमीर पठाण सर, भोसीकर मॅडम, खांडरे मॅडम, गाडे मॅडम, चव्हाण मॅडम, जाधव मॅडम, इंगोले सर मिलिंद खोडके आदी सहित शिक्षकांची उपस्थिती होते सूत्र संचलन प्रदीप भगत यांनी तर आभार प्रदर्शन राजकुमार वारले यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा