मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहमद
मुदखेड तालुक्यातील आडत व्यापारी आसोशियन ची बैठक मोंढा येथील विरशैव गवळी समाज मंदिर येथे आयोनीत करण्याली आली होती.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शंकर राठी माजी उपनगराध्यक्ष मुदखेड, प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष संजय आऊलवार जिल्हा आडत व्यापारी आसोशियन नांदेड , या बैठकीत पुढील प्रमाणे निवड करण्यात आली. मुदखेड तालुका अध्यक्ष पदि संदिप पा. गाढे , कार्यअध्यक्षपदि घनश्याम दाड, उपध्यक्षपदि ज्ञानेश्वर राजकुंठवार कोषाअध्यक्ष पदि विलास नगनुरवा,सचिव पदि अनुप कालानी सह सचिवपदि साईनाथ गंगाधरराव पवार, सदस्य पदि लक्ष्मणराव वट्टमवार, रियाज पठ्ठाण, अमिन अहेमद शेख,संदिप सुर्यवंशी, अशोक जाधव, यानुसार मुदखेड तालुका आडत व्यापारी आसोशियनची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
तर शहर अध्यक्ष पदि गणेश सोनी यांची प्रसंगी बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीस माधवराव सुर्यवंशी ,रूखमाजी आक्कमवाड उपस्थीत होते.आडत असोशिएशनच्या नवनियुक्त कार्यकारणीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा