शेतातील नापिकी व बँकेच्या कर्जामुळे टोकाची भूमिका
बारड/ प्रतिनिधी
अर्धापूर तालुक्यातील पाटणूर येथील शेतकरी गोविंद नारायण सोनटक्के (५१) यांनी दि. १७ रोजी बुधवारी रात्रीला आपल्या राहत्या घरातील नाटीला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली.अल्पभुधारक शेतकरी होते.त्यांच्या कडिल असलेल्या अडीच एकर शेतीवर ते आपला उदरनिर्वाह करत होते.
त्यांनी शेतीसाठी स्टेट बँक शाखा नांदेड यांच्याकडून पिक कर्ज घेतले होते परंतु शेतीत नापिकी झाल्यामुळे उत्पन्न झाले नाही. म्हणून त्यांची पत्नी व मुलगा हे मजुरीने कामाला जाऊ लागले. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली वावरत होते. बँकेचे शेतीसाठी काढलेले कर्ज फेडू न शकल्यामुळे व शेतात सतत नापिकी झाल्यामुळे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुली एक मुलगा असा परिवार आहे.
याबाबत बारड पोलीस स्टेशन मध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा