नांदेड जिल्हा शिक्षक समन्वय संघाकडून जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन
नांदेड/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळांवर काम करणाऱ्या शिक्षकांचा वेतन अनुदानाचा प्रश्न अद्याप निकाली न लागल्याने शिक्षक समन्वय संघाकडून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा,व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा एप्रिल/मे २०२१च्या संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
या विषयीचे निवेदन नांदेड जिल्हा शिक्षक समन्वय संघाकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर व शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.शिक्षक समन्वय संघाचे २९ जानेवारी २०२१ पासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे.
निवेदनात म्हटल्याप्रमाणे शासनाकडून २०% अनुदानासाठी व ४०% अनुदानासाठी पात्र घोषित केलेल्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना अनुदान वितरणाचा आदेश काढला त्याबद्दल महाविकास आघाडीचे अभिनंदन करण्यात येत आहे पण २४ फेब्रुवारी ला घोषित केलेल्या मुंबई कोल्हापूर विभागातील उच्च माध्यमिक शाळांना पुरवणी मागणीतुन वगळण्यात आले आहे.त्या दोन्ही विभागांसाठी शालेय शिक्षण विभागाने निधी देऊन त्यांचा ही अनुदान वितरणाचा शासन निर्णय काढण्यात यावा.
१२,१५,व २४ फेब्रुवारी रोजी शुल्लक त्रुटी दाखवत अपात्र केलेल्या प्राथमिक,माध्यमिक,उच्चमध्यमिक शाळा यांनी त्रुटी पूर्तता करताच त्यांचा ही समावेश पुरवणी निधीत करून,अनुदान वितरणाचा आदेश काढावा.अनुदान वितरण करताना १५/११/११ व ४/६/१४ नसून अनुदान वितरण व्हावे.
सर्व अघोषित प्राथमिक,माध्यमिक,उच्च माध्यमिक शाळा घोषित कराव्यात.विनाअनुदान व अंशतः अनुदानित शाळा वरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती लागू करावी, शिवाय सेवा संरक्षण द्या अश्या मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
मागण्या तातडीने मान्य न झाल्यास ५ एप्रिल २०२१ ते २१ मे २०२१या कालावधीत होणाऱ्या १० वी व १२ च्या बोर्ड परिक्षा कामकाज अर्थात पेपर तपासणी,प्रात्यक्षिक परीक्षा,सुपरविझन आदि कामांवर बहिष्कार कायम राहील असे नमूद करण्यात आले.
निवेदन देताना यावेळी नांदेड जिल्हा शिक्षक समनव्य संघाकडून प्रा.कैलाश खानसोळे, प्रा बापूसाहेब केंद्रे,प्रा.कैलाश जगताप, प्रा सुदर्शन फाजगे आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा