मुगट गावाला मिळाला जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार.

  व्हाट्सअप व फेसबुकच्या माध्यमातून ग्रामविकास अधिकारी सरपंच यांच्या वर शुभेच्छाचा वर्षाव !


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट या गावाची सन २०१९-२०२० या वर्षात ...जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून नुकतीच निवड करण्यात आली आहे. आर.आर. (आबा) पाटील सुंदर गाव स्मार्ट ग्राम पुरस्कार योजनेमध्ये सहभागी झालेल्या नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यातील ग्रामपंचायत मधून १६ ग्रामपंचायतीची निवड तालुका स्मार्ट ग्राम म्हणून यावेळी करण्यात आली आहे. 

या ग्रामपंचायत मधून एका ग्रामपंचायत ला जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ग्रामपंचायतीची निवड ही जिल्हास्तरीय तपासणी समितीने कडून करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी साहेब डॉ.विपीन ईटणकर मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर-घुगे यांचा समावेश होता.  नमूद केलेल्या निकशाच्या अनुषंगाने तपासणी करण्यात आली. त्या तपासणीत सर्वाधिक गुण मुगट ग्रामपंचायतला मिळाल्यामुळे या गावाला जिल्हा स्मार्ट ग्राम  म्हणून यावेळी निवड करण्यात आली आहे.

 नांदेड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकूर- घुगे यांच्या आदेशान्वये आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्कार या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत मुगटला जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे ग्राम अधिकाधिक सुंदर, स्वच्छ, सुशोभित करण्यासाठी म्हणून हा ५० लाख रुपयाचा धनादेश गावाला मिळणार आहे.


मुगट गावाला लाभलेले ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात परम पूज्य श्री श्री रविशंकर जी महाराज यांच्या आर्ट ऑफ लिविंग च्या वतीने गावात सात हॅपिनेस शिबिर घेण्यात आली त्यामुळे गावातील लोकांच्या मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे त्यामुळे गावात हळूहळू बदल होन्यास सुरुवात झाली आहे.


मुगटच्या जिल्हा परिषद सदस्या सौ. अरुणा कल्याणे, संचालक भिमराव पा कल्याणे,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना हाटकर, माजी सभापती सौ.शोभाताई मुंगल, सौ.लक्ष्मीबाई हाटकर, माजी.सरपंच सौ.सुमनबाई कल्याणे, या सर्वांनी नूतन सरपंच सौ. कांताबाई वंजे उपसरपंच श्रीमती जिजाबाई कल्याणे व नवीन ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव कल्याणे व ग्राम विकास अधिकारी राजेश्वर भुरे यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

यावेळी आपल्या मुगट गावाला जिल्हा स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले.हा पुरस्कार मिळाल्यामुळे गावकऱ्यांची जवाबदारी आणखी वाढली आसुन अशाच पध्दतीने यापुढे ही आपल्या सर्वांनी आपलं गाव सुंदर, स्वच्छ, सुशोभित ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या