मुगट येथे घंटा गाडी चे लोकार्पण

  जिल्हा परिषद सदस्या सौ.अरुणा कल्याणे यांच्या हस्ते घंटागाडी चे लोकार्पण 



मुदखेड/ तालुका प्रतिनिधी 

मुदखेड तालुक्यातील मुगट गावामध्ये 'माझे गाव, सुंदर गाव' या अभियानातून गावात खूप मोठ्या प्रमाणात अनेक विकासकामे ग्रामपंचायतच्या माध्यमातून होताना दिसत आहेत.

 गावात स्वच्छता, नालेसफाई यावर अधिक भर दिला जात आहे. गावातील घनकचरा उचलण्यासाठी ग्रामपंचायतीने १५ व्या वित्त आयोगातून गावात एक घंटागाडी खरेदी करण्यात आली आहे. ही घंटा गाडी गावात आल्यावर गावातील घनकचरा उचलण्यासाठी सोयीचे होणार आहे.


 आज या घंटागाडीची लोकार्पण जिल्हा परिषद सदस्या सौ. अरुणा कल्याणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले तर उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते गावातील ग्रामदैवत श्री.हानुमाण मंदिर परिसरात या नवीन घंटागाडीचे पुजन ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आले. 


यावेळी सरपंच सौ. कांताबाई वंजे संचालक भीमराव पा. कल्याणे तंटामुक्ती अध्यक्ष माधवराव पा. कल्याणे, धोंडीबा वंजे ग्रामपंचायत सदस्य धाराजी पवार, एकनाथ कल्याणे, बालाजी कल्याणे, देवदत्त हाटकर, रामेश्वर तुप्पेकर, तुकाराम हाटकर, विलास कल्याणे, वैभव गजेले, पत्रकार आशिष मुगटकर ,ग्रामविकास अधिकारी राजेश्वर भुरे, दादा पाटील,साईनाथ पांचाळ, प्रल्हाद कल्याणे,नारायण रंगवाळ,माधव कल्याणे, दाजीबा कल्याणे, नवनाथ कल्याणे, रामराव कल्याणे, पांडुरंग कल्याणे, विठ्ठल जरतारे, विकास कल्याणे, अनिल कुलकर्णी,चंपतराव कल्याणे, विठ्ठल पवार, लिंगु मिटकर,आदीची यावेळी उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या