बारड / प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते,नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा बारडचे भूमीपुत्र कै. शंकरराव राजाराम देशमुख बारडकर यांची बारड येथे दि.२० रोजी पाचवी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, बारड येथील पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालुन आदरांजली वाहिली आली.
यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष रमेशचंद्र महाजन,सचिव रामेश्वर कोरबनवाड,सहसचिव अशोक गव्हाणे, पंडितराव भोसले शाळेचे मुख्याध्यापक रामकीशन चुबेवार, प्रा नारायण सावंत,प्रा कैलाश खानसोळे, प्रा कैलाश कपाटे,शिवाजी मोरे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा