• नांदेड जिल्ह्यात आज १ हजार १६५ व्यक्ती कोरोना बाधित
• सहा जणांचा मृत्यू
नांदेड/ जिल्हा प्रतिनिधी
दि.२३ रोजी नांदेड जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व पातळीवर प्रयत्नांची शर्त केली जात असून जनतेनेही तेवढ्याच जबाबदारीने जिल्हा जाहीर केलेल्या संचारबंदीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
हा लढा सर्वांच्या मुक्तीचा असून सर्वांनी एकत्रीत आपले कर्तव्य व काळजी घेतली तर जिल्ह्यात वाढत जाणाऱ्या कोरोना प्रादुर्भावाला आपण यशस्वीपणे नियंत्रणात आणू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्ह्यात दिनांक २४ मार्च रोजी १ हजार १६५ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. हे अहवाल ४ हजार ९२४ तपासण्यांमधून आले असून यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६०८ तर अँटिजेन तपासणीद्वारे ५५७ अहवाल बाधित आहेत. आजचे १ हजार १६५ बाधित मिळून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ३५ हजार ५०२ एवढी झाली आहे.
आजच्या ४ हजार ९२४ अहवाला प्राप्त ३ हजार ६४२ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता ३५ हजार ५०२ एवढी झाली असून यातील २६ हजार ७७९ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण ७ हजार ८१६ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील ६२ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
एकुण घेतलेले स्वॅब- २ लाख ८५ हजार ५३
एकुण निगेटिव्ह स्वॅब- २ लाख ४३ हजार ६४९
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- ३५ हजार ५०२
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- २६ हजार ७७९
एकुण मृत्यू संख्या-६७४
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.४२ टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-२९
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-६८
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-४१०
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-७ हजार ८१६
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-६२.
शासकीय रुग्णालयातील संपर्क अधिकारी म्हणून जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथील डॉ. अंकुशे कुलदिपक मो. 9850978036, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथील डॉ. खान निसार अली मो. 9325607099, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड डॉ. वाय. एच. चव्हाण 9970054434 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा