मुदखेड शहरात दररोज सुरळीत पाणीपुरवठा करा!- अमोल आबादार

 संपादक आशिष मुगटकर

निवेदन :- मुदखेड शहरात पाणीपुरवठा दररोज सुरळीत करण्यात यावा. यामागणीसाठी आमोल आबादार यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी नगरपरिषद मुदखेड यांना लेखी निवेदन देण्यात आले.


मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहमद

मुदखेड नगरपरिषदे कडून मुदखेड शहरात दोन दिवसा आड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे वर्षांमध्ये सहा महिनेच नागरिकांना चांगल्या प्रकारे पाणीपुरवठा होत आहे म्हणून नगर परिषदेने सहा महिन्याची नागरिकांकडून पाणीपट्टी वसूल करावी. नगर परिषदेच्या या ढिसाळ कारभारामुळे आज मुदखेड शहरातील लोकांना दोन दिवसा आड पाणी घेण्याची वेळ आली आहे दरवर्षीपेक्षा या ही वर्षी पाऊस मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे तरी पण एवढा पाऊस पडून सुद्धा नगर परिषद पाणी पुरवठा दोन दिवसा आड करत आहे याचे कारण काय? नगरपरिषदेने पाण्याचे योग्य नियोजन करून नागरिकांना शुद्ध, दररोज पाणी द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

 अमोल आबादार (शहर संघटक मुदखेड) यांच्या नेतृत्वाखाली मुख्याधिकारी नगरपरिषद मुदखेड यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी संतोष बोडके, कालिदास जंगी लवाड, प्रकाश बल्फेवाड, राहुल कोटे वाड, सुरेश फुलारी, राकेश हेमके ,माधव असवलकर, सुरज हेंबाडे आधीची यावेळी उपस्थिती होती.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या