सर्वसामान्याची लुट थांबवा ; भाजपाचा तीव्र आंदोलनाचा दिला इशारा.
![]() |
| निवेदन :- बारड येथील विठाई गॅस एजन्सी जादा दराने गॅस विक्री करत असल्याने निवेदन भाजपा शहर संघटक आमोल आबादार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदअधिका-याने तहसिलदार दिनेश झांपले यांना दिले. |
मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतीक अहेमद
मुदखेड तालूक्यातील बारड या ठिकाणी असलेली विठाई गॅस एजन्सी जादा दराने गॅस विक्री करत असल्याने निवेदन भाजपा शहर संघटक आमोल आबादार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा पदअधिका-याने मा. तहसिलदार दिनेश झांपले साहेब यांना दिले. सदरील गॅस एजन्सी नियमापेक्षा ५५ रू जास्त घेत आहे. आणि ग्राहकाला त्याची पावती पण देत नाही. नियमाने १५ किमी विनाशुल्क देणे अपेक्षित आहे. पण जो नागरिक तक्रार करतो त्याला ५५ रू सुट देण्यात येते. आणि सर्वसामान्य नागरिकांना मात्र ५५ रू जादा दराने सिलेंडर विक्री केली जाते. यामध्ये सर्वसामान्य जनतेची लुट होत आहे असे या तक्रारीत म्हटले आहे.
सदरील निवेदनाची लवकरात लवकर दखल न घेतल्यास तहसिल कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला. यावेळी भा.ज.पा. युवा जिल्हाअध्यक्ष किशोर देशमुख युवा शहअध्यक्ष प्रकाश बल्फेवाड, शहर संघटक अमोल आबादार, शहर उपाध्यक्ष संतोष चमकुरे, राहुल कोठेवाड, कालीदास जंगीलवाड, संतोष बोडके, राकेश हेमके, सुरेश कल्याणे, सुरज हेबाडे, माधव आस्कुलकर, उमा आडाणे श्याम मोरे व असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते.
सदरील गॅस एजन्सी १५ किमी विनाशुल्क देणे अपेक्षित आहे. याचा खर्च एच. पी कंपनीकडून एजन्सीला भेटत असतो. मग सर्वसामान्य माणसांकडून जास्त पैसे घेणे आणि कंपनीकडून पण पैसे घेणे ही लुट नाही तर काय असा प्रश्न पत्रकाराशी बोलतांना श.संघटक अमोल आबादार यांना विचारला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा