कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अत्यंत साधेपणाने जयंती साजरी
मुगट / प्रतिनिधी
मुगट येथील बस स्थानकाजवळ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी राजे भोसले यांची जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात आली.
देवगिर बुवा मठ संस्थान चे मठाधिपती मोतीगिरी महाराज यांच्या हस्ते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करून ध्वजारोहण करण्यात आले.
उपस्थित गावातील मंडळी च्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले. तरुणांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर यावर्षीची जयंती अत्यंत साध्या पद्धतीने मिरवणूक न काढता, न कसला गाजावाजा करता मुख्य जागेवरच साजरी करण्यात आली.
गावात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिवजयंती चे आयोजन करण्यात आले होते परंतु कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या वर्षीची शिवजयंती ही अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचे ठरवले.
यावेळी रमेश पा.कल्याणे, विलास कल्याणे, माधवराव पा. कल्याणे, डिंगाबर सावंत,शिवाजी कल्याणे, योगेश कल्याणे, विकास कल्याणे, आशिष पाटील, कपिल कल्याणे, साईनाथ देशमुख, विठ्ठल जरतारे,मनचीक कल्याणे, विकास कल्याणे, राजेश कल्याणे, सतीश कल्याणे, पांडुरंग कल्याणे, सेहवाग कल्याणे, राहुल कल्याणे,शुभम कल्याणे, राजेश मुंगल, प्रदिप कल्याणे, गंगाधर कल्याणे, साईनाथ उदगिरे,सह गावातील अनेक तरुणांची यावेळी उपस्थिती होती.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा