तळणी परिसरातील तुर अज्ञात रोगामुळे गेली वाळुन

सोयाबीन नंतर तुर पीकावर आलेल्या संकटामुळे शेतकरी हावालदिक

संपादक आशिष मुगटक

तळणी परिसरात तुर पीकावर आलेल्या रोगाची पाहणी करताना .


हदगाव/ तालुका प्रतिनिधी

   हदगाव तालुक्यातील तळणी परिसरातील अनेक शेतकऱ्यानी तुरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. सद्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत तुर पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उभी असलेली तुर वाळून जात आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले सोयाबीन पिक  अगोदरच गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला. सोयाबीन पिकावर अस्मानी संकट आले असताना तुर पिक सुद्धा या अचानक आलेल्या रोगामुळे हातातून गेले आहे.एकीकडे तुर पिकावर अचानक आलेल्या रोगामुळे शेतकरी संकटात सापडला असताना कृषी विभागाने याकडे दुर्लक्ष केले असून तालुका कृषी कार्यालय सध्या झोपेतच आहे हे दिसत आहे. शेतकऱ्यांनी भ्रमन ध्वनीवर कृषी सहाय्यक यांच्या शी बोलले असता त्यांनी असे  सांगितले कि मि अडीशनल आहे असे सांगून फोन ठेवून दिला.

ऐवढ्या मोठ्या तळणी गावासाठी पुर्ण वेळ कृषी सहायक मिळेल काय ?. जर मिळत नसेल तर अशा अचानकपणे आलेल्या रोगाला शेतकऱ्यांनी कशाप्रकारे बंदोबस्त करावा त्यासाठी तालुका कृषी अधिकारी यांनी पहानी करून शेतकऱ्यांना तात्काळ मार्गदर्शन करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांच्या कडून केले जात आहे. 

संकटात सापडले शेतकऱ्यांना भावनिकधीर देन्यासाठी अखिल भारतीय शेतकरी विकास संघटना मराठवाडा विभाग प्रमुख तथा किसान ब्रिगेड नांदेड जिल्हा प्रमुख भगवानराव देशमुख, आणि शेतकरी प्रतापराव लोखंडे, प्रकाश तावडे, गजानन तावडे ,संघपाल पाईकराव , रामराव जाधव ,विष्णु तावडे , बळिराम चौरे यांनी तुर पिकाची शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांना दिलासा दिला.

भगवानराव देशमुख यांनी मातृभूमी न्युजशी बोलताना सांगितले की शेतकऱ्यां वर पुन्हा एकदा संकटं कोसळले असुन कृषी विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुर पिकावर आलेल्या अचानक रोगामुळे  शेतात विदारक चित्र दिसत आहे असे ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या