मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद
दि.६रोजी.मुदखेड येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या नियोजित जागी नगर परिषद मुदखेडच्या वतिने दरवर्षी प्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४व्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त आयोजित आदरांजली सभेच्या ठिकाणी काही निवडक आंबेडकरी अनुयायानी बाबासाहेब आंबेडकरांना शब्दांजली अर्पण केली.
यावेळी बोलताना भाजपाचे मराठवाडा प्रभारी नेते प्रवीण गायकवाड म्हणाले की,बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला ते समाजाने मुखोगत केला आहे.जसेकी शिक्षण हे वाघिनिचे दुध आहे.ते प्राशन केल्यास माणूस गुर्रगुर्रल्या शिवाय रहाणार नाही.शिका! संघटीत व्हा! संघर्ष करा!समता-बंधुता-न्याय आणि स्वातंत्र्य असे मोठ मोठे शब्द माझ्या सारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या तोंडून अनेकदा सहजतेने ऐकायला मिळतात.हे बाबासाहेबांचे विचार आपण जसे उच्चारतो तसे अंगिकारणे देखील महत्वाचे आहे.जसेकी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला विचार व्यक्त करण्यासाठी भाषण स्वातंत्र्य दिले आहे.याचा अर्थ बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षीत आसलेली लोकशाही समजुन घेणे गरजेचे आहे.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे.मानव समाजाच्या अंगातिल रक्ताचा थेंबही न सांडता समाजामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणनारी प्रक्रिया म्हणजे लोकशाही असे सांगितले आहे.
या बाबासाहेबांच्या लोकशाही मूल्यांचे जतन करतांना अपण जेंव्हा समाजात आपले भाषण स्वातंत्र्य व्यक्त करतो तेंव्हा त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार होणार नाही याची दक्षता घेऊन,व्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांची जोपासना करणे ही बाबासाहेबांना आचरणाची आदरांजली ठरेल असे परखड मत व्यक्त केले.
या वेळी सचिनकुमार कांबळे,रत्नाकर तारु,महेंद्र काळबांडे,देवराव चौदंते,भिसे आदींची समायोचीत भाषणे झाली.
या कार्यक्रमास नारायणराव चौदंते,प्रा.दिनेश शेटे,सुदाम गायकवाड,एकनाथ तारु,संजय सोनटक्के,दादाराव चौदंते,शिवानंद देवके,विलास कांबळे,मन्सूर पठान,सतिश पाटिल मुंगल,सुभाष चौ दंते,सुभाष यरपलवाड,सचिनकुमार कांबळे,ढगारे उपासक आदी आंबेडकरी अनुयाई उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा