काँग्रेस पक्षाचा बंद बारडकर यांचा पुढाकार

शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा ;कृषी विधेयक कायद्यास विरोध

संपादक आशिष मुगटकर

बारड/ प्रतिनिधी

दि.८ डिसेंबर- शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंद देशव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाच्या वतीने घेण्यात आल्याने अशोक चव्हाण यांच्या आदेशान्वये बारच्या ग्रामस्थांनी पुढाकार घेत गाव कडकडीत बंद ठेवून पाठिंबा दिला असून केंद्र शासनाच्या कृषि विधेयक कायदा विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

     केंद्र शासनाने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सप्टेंबर 2020 संसदेत कृषी विधेयक कायदा पारित केला असल्याचा आरोप आहे. शेतकऱ्यांसाठी कृषी विधेयक घातक असल्याने देशाची ची राजधानी दिल्ली येथे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे परंतु केंद्र शासन तसेच शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या चर्चेतून तोडगा निघाला नसल्याने लक्ष वेधण्यासाठी दि.८ डिसेंबर भारत बंद देशव्यापी आंदोलन घेण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या वतीने बंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला होता जिल्ह्याचे पालकमंत्री तथा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या आदेशान्वये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

     या धर्तीवर काँग्रेस जिल्हा सल्लागार उत्तमराव लोमटे यांनी दि.८ डिसेंबरला बारड बंद ठेवण्यात संदर्भात पोलिस प्रशासनाला लेखी निवेदन दिले होते.काँग्रेस पक्षाच्या बंदच्या हाकेला दाद देत व्यापारी संघटनेने संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. केंद्र शासनाचा कृषी विधेयक कायदा शेतकरीविरोधी असून यामध्ये सुधारणा करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन चढण्याचा इशारा या वेळी देण्यात आला आहे.भाजप वगळता सर्व पक्ष संघटना यांनी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला आहे.  

      काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी गाव बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते.व्यापाऱ्यांना बाजारपेठ बंद ठेवण्यासंदर्भात सक्ती करण्यात आली नाही परंतु शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय सर्व स्तरातून घेण्यात आला होता.व्यापारी संघटनेचे अशिष देशमुख यांनी करुणा संकटामुळे आर्थिक घडी विस्कटली असून व्यापाऱ्यांना वेठीस धरून बाजारपेठ बंद करण्यात येऊ नये असा सल्ला दिला.भारत बंद आंदोलन यशस्वीतेसाठी काँग्रेस जिल्हा सल्लागार उत्तमराव लोमटे, श्रीराम कोरे ,राहुल आठवले, बालाजी लोणवाडे ,किशोर पिलेवाड ,गुणाजी आमदुकर, आनंदा कांबळे ,बालाजी चव्हाण, संजय आठवले, बंटी कांबळे, बाबुराव लोमटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या