लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमीत्त अभिवादन

  मुदखेड भाजपचे अनेक कार्यकर्ते उपस्थित

संपादक आशिष मुगटकर

मुदखेड/ शहर प्रतिनिधी/ अतिक अहेमद

    दि.१२ रोजी मदखेड येथील लुंबिनी नगर स्थित कार्यालयात भाजपाच्या वतिने लोकनेते माजी केंद्रीय मंत्री गोपिनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.या वेळी उपस्थित मान्यवर मंडळींच्या हस्ते लोकनेते पुष्प माला अर्पण करुन,धुप आणि दीप प्रज्वलीत केले आणि लोकनेत्याच्या विचारांची उजळणी करुन अभिवादन करण्यात आले.

     या अभिवादन कार्यक्रमास भाजपचे मराठवाडा प्रदेश प्रभारी प्रवीण गायकवाड,मुदखेड बाजार समितीचे माजी सभापती भगवान पानेवार,माजी संचालक निळकंठ हामंद,अल्पसंख्यांक मोर्चाचे शेख रफिक,प्रा.दिनेश शेटे,मोदी विचार मंचचे जिल्हाध्यक्ष सतिश पाटिल मुंगल,ता.अध्यक्ष भायेश्वर मुंगल,माधव वाघमारे,केशव पाटिल ढगे,गंगाधर कसबे, म.कबिर,हानिफ खुरेशी,लक्षिमन पाटिल मुंगल,चांदू निखाते,मारुती गायकवाड, आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या