जिल्ह्यातील शिक्षक - शिक्षिका धरणे आंदोलनात सहभागी
नांदेड प्रतिनिधी/ आशिष कल्याणे
दि १४ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नांदेड येथें महाराष्ट्र राज्य उमावि/कमवी शाळा कृती संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी १४६ व १६३८ उच्च माध्यमिक विदयालय/कमवि चा २४/०२/२०२०/च्या पुरवरणी नुसार अनुदान वितरणाचा आदेश निर्गमित करणेबाबत व अघोषीत उच्च माध्यमिक शाळा घोषीत करुण आर्थीक तरतूद करनेबाबत या मागण्या करीत शासनाच लक्ष केंद्रीत करण्यात आले.
१३ सप्टेंबर २०१९ नुसार घोषीत व अनुदानास मंजुर १४६ व १६३८ उच्च माध्यमिक विद्यालयांना २४ फेब्रुवारी २०२० च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंजूर पुरवणी मागणीदवारे १०६ कोटी ७४ लक्ष ७२ हजार रुपये मंजूर असलेला निधी तात्काळ वितरीत करण्यासंदर्भातील शासन आदेश निर्गमित करण्यात यावा मागील १८ वर्षापासून विनावेतन वेठबिगारीचे जीवन जगणाऱ्या शिक्षक बांधवांवर हा मोठा अन्याय आहे. निधी मंजूर असून वारंवार तपासणीच्या नावाखाली वितरणाचा आदेश निर्गमित केला जात नाही. तरी तपासणीच्या अहवालाच्या अधीन राहुन याच अधिवेशनात निधी वितरणाचा आदेश निर्गमित करावा यासाठी दि.१४/१२/२०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे धरणे आंदोलन करून निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलनाचे वेळी सर्व शिक्षक व सहकारी मास्क व सॅनिटायझरचा वापर करीत व शासनाचे आदेशांचे पूर्णतः पालन केले यावेळी लातूर विभागीय कार्याध्यक्ष प्रा कैलाश खानसोळे, लातुर विभागीय उपाध्यक्ष प्रा भागवत गोरे,नांदेड जिल्हाध्यक्ष प्रा सुधोधन हाटकर सह जिल्ह्यातील असंख्य महिला व पुरुष शिक्षकांनी सहभाग घेतला होता.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा