खालसा पंथ की पुजनीय माता

 माता साहिब देवांजी जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ.


मुदखेड/ तालुका प्रतिनिधी

 मुदखेड तालुक्यातील मुगट परिसरात गोदावरीच्या काठावरील सत युगतील पतीत पावन  तपोभूमी असलेल्या ऐतिहासिक गुरुव्दार हा "माता साहिब देवांजीच्या" नावाने ओळखला जातो.

या ठिकाणी माता साहिब देवांजीचा ३३८वा जन्मोत्सव सोहळा  दरवर्षी प्रमाने साजरा केला.त्याच पध्दतीने याही वर्षी माता साहिब देवांजी यांच्या ३३९व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.हा जन्मोत्सव सोहळा तीन दिवस चालणार आहे. 

या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात दि.२६ सोमवार पासून ते दि.२८पर्यत असनार आहे. या जन्मोत्सव सोहळ्याचे उद् घाटन सिंगसाब जत्थेदार बाबा कुलवंत सिंगजी तख्त सचखंड श्री हजूर साहीब नांदेड ,गुरुव्दारा श्री लंगर साहिबचे संतबाबा बलविंदर सिंगजी कारसेवावाले,गुरुव्दारा माता साहिबचे प्रमुख जत्थेदार बाबा तेजासिंगजी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.


या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात दि.२६रोजी सोमवारी पासून  धार्मिक दिवान मध्ये कीर्तनकार,हजूरी रागी,भाई गुरुप्रताप सिंगजी,भाई जीवन सिंगजी, भाई जगतेश्वर सिंगजी पटीयाला,रागी जत्था, गुरुव्दारा माता साहिब देवांजी लाडली फौज यांच्या सुमधुर वाणीतुन कीर्तन, प्रवचन, व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२७ रोजी घोड्यांच्या चित्तथरारक कसरती चे प्रात्यक्षिक व नेमबाजी चे आयोजन केले आहे.दि.२८ रोजी या जन्मोत्सव सोहळ्याची सांगता महानगर कीर्तन करत गुरुव्दारा हिराघाट या ठिकाणी होनार आहे.

सिंगसाब जत्थेदार बाबा कुलवंतसिंगजी(तख्त सचखंड श्री हजूर साहीब नांदेड),पंचप्यारे साहीबान,कारसेवावाले बाबा नरिंदरसिंगजी,बाबा बलविंदरसिंगजी,हजूरी साथ संगत व दलपंथ यांची या सोहळ्याला उपस्थिती राहणार आहे.


या जन्मोत्सव सोहळ्यात सुप्रसिद्ध रागी, कथाकार, कीर्तनकार व धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित असणार आहे. गुरुव्दारा परिसरात वैद्यकीय सेवा पथकाची नियुक्ती केली आहे. या धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळन्याचे आवाहन प्रमुख जत्थेदार बाबा तेजासिंगजी चेलाबाबा प्रेमसिंगजी पिता गुरुगोविंदसिंगजी,गुरुव्दारा माता साहिब देवांजी बुढादल मुगट  यांनी केले आहे.भाविकासांठी याठिकाणी विशेष लंगरचे आयोजन करण्यात आले आहे. मुदखेड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

२ टिप्पण्या:

लोकप्रिय बातम्या