महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा .
बारड/ प्रतिनिधी
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूर महाराज यांनी १९४५ साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते.एकवीस वर्षाच्या हिमालयातील तपश्चर्येनंतर संपूर्ण जीवन समाजासाठी अर्पण केले आहे.समाज बांधव, सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील मंडळीकडून आप्पाना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची मागणी केली होती.
राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे आज दुपारच्या सुमारास लिंगैक्य झाले, मृत्यूसमयी त्यांचे वय १०४ वर्षाचे होते गेल्या चार दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही सोमवारी त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा पसरल्याने हजारो भाविक भक्त समुदाय अहमदपूर येथील भक्ती स्थळावर जमले होते.त्यातच आज आप्पा लिंगेक्य झालेत.
राष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी १९४५ साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत, वीरशैव लिंगायत समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरलीय.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यातून त्यांना दोन वेळा तुरुंगवास देखील भोगला होता. अप्पांच्या जाण्याने लिंगायत समाज पोरका झाला असून समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना समाज बांधवा कडून व्यक्त होत आहे, दरम्यान डॉ व्यंकटेश काब्दे यांनी त्यांच्या मृत्यूची घोषणा केली. अहमदपूरकर महाराज यांच्या शरीरातील ऑक्सिजन स्तर खूप कमी झाला होता. तसेच श्वास घेण्यास त्यांना त्रास होत असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, अखिल भारतीय मराठी ग्रामीण पत्रकार संघ, पत्रकार संरक्षण समिती मुदखेड कडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा