मनसे तालुकाध्यक्ष माधव पावडे यांची मागणी.
संपादक आशिष मुगटकर
![]() |
| निवेदन : - महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुदखेड च्या वतीने मागील सहा महिन्यांचे घरगुती वीज बिल माफ करा या मागणीसाठी चे निवेदन महावितरण अभियंता मुदखेड यांना देण्यात आले. |
मुदखेड/ तालुका प्रतिनिधी
मुदखेड येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महावितरण चे अभियंता यांना लेखी निवेदन देऊन घरगुती विज बिल माफ करण्यासाठीची मागणी करण्यात आली आहे.
कोविड -१९ च्या महारोगामुळे मोठ्याप्रमाणात नागरिकांची आर्थिक, मानसिक हानी होत असताना महावितरण कार्यालयातून वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करून वीज बीले भरण्याचा तगादा नागरिकांना लावला जात असून नागरिकांची वीज बिलाबाबत दुविधा निर्माण झाली आहे. अगोदरच आर्थिक हानी होत असतांना मोठ्या प्रमाणात रकमेची धसकी नागरिकांना भरली जात आहे. घरगुती वीज देयकाची मागील सहा महिन्याचे बिल माफ करण्यात यावी.
वीज बिलाची येणारी रक्कम रिडींग प्रमाणे देण्यात यावी अन्यथा मनसे स्टाईल तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष माधव पावडे, मयुर पाटील, बालाजी कल्याणे,चंदुप्रकाश वारे,पपु धबडगे, अभिजित नातेवाड,सह आदी मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा