समाज बांधवाकडून श्रद्धांजली अर्पण..
![]() |
| श्रद्धांजली :- बारड येथे वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना येथील शिवालय मंदिरात समाज बांधवांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. |
बारड/ प्रतिनिधी
वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांना मुदखेड तालुक्यातील बारड येथील शिवालय मंदिरात समाज बांधवांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. यावेळी अहमदपूरकर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे.
राष्ट्रसंत अहमदपूर महाराज यांनी १९४५ साली वैद्यकीय शिक्षण घेतले होते मात्र ते कधीच वैद्यकीय व्यवसायात रमले नाहीत,त्यांनी एकविस वर्षे हीमालयातील जंगलात तपश्चर्या केली त्यानंतर त्यांनी संपूर्ण आयुष्य समाज कल्याणासाठी वाहिली आहे वीरशैव लिंगायत समाजा च्या धार्मिक कार्यक्रमात आपल्या आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी सहभाग नोंदवला त्यांच्या निधनाने महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक मधल्या त्यांच्या लाखो भक्तांवर शोककळा पसरलीय
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्यातून त्यांना दोन वेळा तुरुंगवास देखील भोगला होता. अप्पांच्या जाण्याने लिंगायत समाज पोरका झाला असून समाजाची अपरिमित हानी झाल्याची भावना समाज बांधवाकडून यावेळी व्यक्त झाल्या आहेत.तसेच समाज बांधव, सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील मंडळीकडून त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी ही करण्यात आली होती सोशल डिस्टन चे पालन करत यावेळी सामूहिक एक मिनिटं शांततेत उभे राहून श्रद्धांजली वाहीली आहे.यावेळी श्रीराम कोरे दिलीप कोरे, प्रभाकर भीमावर,रामजी मुलंगे, नरसिंग आठवले प्रताप देशमुख काशिनाथ मुलंगे,वसंत लालमे, बालाजी आम्रे, परमेश्वर भीमेवार,शिवप्रसाद कराळे,नामदेव बिचेवार, बंडू लालमे, प्रकाश लालमे, गंगाधर स्वामी, सचिन कनसठे,नामदेव उपवार, सदाशिव तांडे,देवबा कराळे,बाबुराव बिचेवार,रामेश्वर धुडकेवार,किशोर पिल्लेवाड, जीवन भीमेवार, सुरेश एमले,माधव कत्रे,सदाशिव तांडे, गजानन कराळे शेख अबू, बालाजी कोरे स्वप्नील कोरे सदाशिव महाराज रामेश्वर कराळे बालाजी कात्रे देविदास कराळे आदीसह समाज बांधव उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा