कोविड -१९ च्या नियमांचे पालन करीत जयंती व अवतार दिनोत्सव सोहळा संपन्न
नांदेड/ प्रतिनिधी/ आशिष कल्याणे
मुदखेड तालुक्यातील कामळज येथे कोविड-१९ च्या नियमांचे काटेकोर पालन करीत महानुभाव पंथाचे संस्थापक, परब्रम्ह परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व श्री गोविंद प्रभू महाराज अवतार दिना मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्या निमित्ताने दि ३१ ऑगस्ट सोमवार रोजी रात्री ९:०० वाजता प पु प म श्री प्रभाकर बाबा कपाटे यांच्या सुमधूर कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात दि:०१सप्टेंबर मंगळवार रोजी सकाळी ठीक ७:००वाजता श्रीमदभगवतगीता पारायण,८ वाजता प पु प म श्री रमेशशास्त्री बिजेगाव यांच्या हस्ते ध्वजारोहण,प पु प म श्री खाडे बाबा सांगवी यांच्या हस्ते विचारपीठाचे उदघाटन,नांदेड जिल्हा महानुभाव परिषदेचे अध्यक्ष प म प श्री कान्हेराज बाबा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून धर्मसभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रस्तावित प पु प म श्री अनंतव्यास जावळे यांनी केले. प्रमुख पाहुणे प पु प म श्री रमेशदादा शास्त्री यांच्या वाणीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या आचार विचार आणि तत्वज्ञान यावर प्रकाश टाकला तर प पु प म श्री विजयराज दादा नांदेडकर यांनी गोविंद प्रभू महाराज
राऊळ माय, राऊळ बाप
महाराजांच्या लीळा सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आणि कार्यक्रमाचा प पु प म श्री प्रभाकर बाबा कपाटे यांनी अध्यक्षीय समारोप केला तर सूत्रसंचालन शाहीर दामोदर अण्णा वजीरगावकर तर कार्यक्रमाचा शेवट माजी सरपंच नागोराव दत्तराव खानसोळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाले.
यावेळी प पु प्रभाकर बाबा कपाटे भोकर, प पु रमेशदादा शास्त्री बिजेगाव,प पु विजयराज दादा नांदेडकर प पु येलेंराज बाबा इजळी,प पु कान्हेराज बाबा जिल्हाध्यक्ष नांदेड जिल्हा महानुभाव परिषद ,प पु खाडे बाबा सांगवी,प पु खरवळकर बाबा सिंधी,प पु शहागडकर बाबा निवघा बाजार यासह जिल्ह्यातील महानुभाव पंथाचे संत,महंत व उपदेशी माता भगिनी उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी कोंडीबा खोबाजी खानसोळे, माधवराव तोलबा वासरीकर,प्रभाकर शंकरराव खानसोळे, दत्ता श्यामजी खानसोळे, भायसर शिवराम खानसोळे, दादाराव विठोबा खानसोळे, बालाजी सोनाजी खानसोळे, बालाजी शावजी खानसोळे, संजय भगवती खानसोळे, मोतीराम आबाजी खानसोळे, दत्ता चंपती खानसोळे,सुदाम गोविंदराव पडोळे,प्रल्हाद रावसाहेब ढाकणीकर,सारंगधर आनंदराव खानसोळे यासह गावकरी मंडळींच्या सहकार्याने कार्यक्रम संपन्न झाला

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा