शेतकऱ्यांचे_पंचप्राण युगात्मा शरद जोशी साहेब यांच्या ८६ वी जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!

!! शरद जोशी !!
श्री.छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जोतिबा फुले नंतर शेतकऱ्यांना संघटित करून अन्याय विरुद्ध लढायला शिकवणारे, शेतकरी चळवळीचे जनक, शेतकऱ्यांचे पंचप्राण *स्वर्गीय शरद जोशी *यांची ३ सप्टेंबर रोजी ८६ वी जयंती आहे.त्या निमित्त विनम्र अभिवादन करून आदरणीय शरद जोशी साहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकणारा हा लेख.
वर्षानुवर्षे आर्थिक गुलामगिरीत आणि आपल्या हक्कासाठी न लढणारा शेतकरी शरद जोशी यांच्यामुळे आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायला पोलिसांच्या गोळ्या खायला पाठीवर लाठ्या झेलायला तयार झाला तो फक्त शरद जोशी मुळेच शरद जोशींच्या एका हाकेला हो देऊन आपल्या हक्कासाठी लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले सबंध जगानी पाहिले आहे मुका असलेला शेतकरी बोलायला लागला प्रस्थापितांच्या नजरेस नजर भिडवून बोलायला लागला.
१९८०च्या दशकांमध्ये ज्यावेळेस शरद जोशींनी शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेऊन आंदोलनाला सुरुवात केली त्यावेळी काही पुढारी हसत होती आणि म्हणत होती की एक दिवस कुत्र्याची शेपूट सरळ होईल व शेतकऱ्यांची संघटना होऊ शकत नाही मात्र शरद जोशी शेतकऱ्यांची संघटना शेतकरी एकत्र करून इतिहास जमा लाखोच्या सभा घेऊन दाखवून दिले .
तेव्हा राजकारणी पुढाऱ्यांनी शरद जोशींची जात समोर करून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत होते व या बामनाला शेतीतलं काय कळतं त्यावेळेस शरद जोशी यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला त्यामुळे राजकीय लोकांच्या टीकेला शरद जोशी उत्तर दिले नाही किंबहुना विरोधाला उत्तर देण्याची गरज पडली नाही परंतु पुढाऱ्यांना शेतकऱ्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास पुढाऱ्यांची बोलती बंद शेतकरी करू लागला शरद जोशी ब्राह्मण म्हणतात तर तुम्ही इतके दिवस शेती प्रश्नावर का बोलले नाही आणि आणि त्यानंतर शरद जोशींच्या जातीचा उल्लेख मागे पडला
शरद जोशी मुळे.
आपल्या लुटीच्या सरकारच्या धोरणापायी शेतकऱ्यांना लुटीची जाणीव झाली.
शरद जोशी मुळे.
१९८० च्या अगोदर शेतकरी वर्षानुवर्षे नशिबाला निसर्गाला देवाचा खूप झाला असे समजून समाधान मानत होता रक्ताचे पाणी करून एका दाण्याचे शंभर दाणे पिकवून उभ्या जगाला जवणारा जगाचा पोशिंदा बळीराजा च्या नंतर राजा झाला *छत्रपती शिवाजी महाराज,शाहु,फुले,नंतर महापुरुष शरद जोशी*
साहेबांनी शेतकऱ्यांना वाघाची डरकाळी फोडण्याची हिम्मत दिली ती फक्त शरद जोशी साहेबांमुळे ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली?रेड्यामुखी वेद बोलवून घेतले? या सर्व कथा आपण पोथी पुराणातून ऐकत आलो आहोत काय खरं काय खोटं? माझ्या लहानपणी गावात बहुरूपी पोलीस गावात आला तर त्याला घाबरून लोक लपायचे अशा काळामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनात ज्ञानेश्वर रुपी शरद जोशी आल्यापासून बँक वसुली थांबली वसुली अधिकारी शेतकऱ्यांच्या घरातील वस्तू रस्त्यावर आणून घरावरचे पत्र काढून शेतकऱ्यांना अपमानित करत होते ते थांबले *फक्त शरद जोशी मुळे*
आणि आणि शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याची स्वातंत्र्य मिळवून दिल्याने आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा देवळातल्या देवापेक्षा आपला देऊ शरद जोशी मानले शेतकऱ्यांना आपला खरा ज्ञानेश्वर रुपी शरद जोशी शेतकऱ्यांच्या घरातल्या देवघरात बसवले आणि पूजाच मांडली दगडा देव नसून माणसात देव ओळखण्याची नजर मिळाली शरद जोशी जिंदाबाद चा हा चमत्कार हे एका घोषनात रेल्वेने विनातिकीट दिल्लीसह देश शेतकऱ्यांना पाहायला मिळाला शरद जोशी यांच्या नावाची ताकद सर्वांनी अनुभवली आहे.
आज आपण पाहात आहोत शरद जोशी च्या विचारातून त्या विचारांची प्रेरणा घेऊन महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी फळ आणि आणि कडधान्य भाजीपाला नियमन मुक्ती साठी अत्यंत निकराची लढाई विधान परिषदेमध्ये दिली आणि त्या माध्यमातून हा निर्णय राज्याला लागू करण्यास भाग पाडले व सदाभाऊ खोत एवढ्यावरच न थांबता केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला आणि आणि मोदी सरकारने सदाभाऊ खोत यांच्या शिफारशीला तत्काळ मान्यता देऊन ते दोन्ही ही शेतकरी विरोधी कायदे रद्द केले हेच शरद जोशी यांच्या विचाराचे यश आहे.सदाभाऊ खोत यांनी त्यासाठी प्रमाणिकपणे प्रयत्न केले.साहेबांनी ४०वर्षापुर्वी शेतमाल नियमनमुक्ती, कर्जमुक्ती,विज बिल मुक्ती,चा लढा दिली,शरद जोशींनी मांडलेले शेतकरी हीताचे कायदे मान्य झाले आहे.शरद जोशींच्या तालमीत तयार झालेल चळवळीतल नेत्तुत्व एक राज्याच्या मंत्रीमंडळात माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांनी भाजीपाला कडधान्य बाजार समिती बरखास्त करण्याची शरद जोशी साहेबांनी केलेल्या मागणीचे सरकार दरबारी मांडत. बाजार समिती नियमनमुक्ती च्याविरोध आंदोलन करणाऱ्यांच्या विरोधी राज्यव्यापी प्रति आंदोलन करुन या नव्या कायद्याचे स्वागत सर्वप्रथम करुन शरद जोशींना खरी श्रद्धांजली कार्यातुन वाहीली आहे.
शेतकऱ्यांचे पंचप्राण स्व.शरद जोशी यांच्या ८६ वी जयंती निमित्त विनम्र अभिवादन 💐💐
विशेषलेखन :-
मधुकर आवचार जिल्हा उपाध्यक्ष,
रयत क्रांती संघटना परभणी.
मो.8830679195
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा