मुदखेड शहरात गणपती बाप्पाला साधेपणाने भावपूर्ण निरोप.
संपादक आशिष मुगटकर
बारड /प्रतिनिधी
मुदखेड शहरात कोरोनाच्या माहमारीत अगदी साधेपणाने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आले आहे.गेल्या अकरा दिवस गणरायाच्या चरणी प्रार्थना
करून देशात व राज्यात कोरोणाच्या महामारी लवकरच मुक्त कर असे साकडे बाळगोपाळानी बाप्पाला घालुन आमदुरा येथील गोदावरी नदीपात्रात गणपती बाप्पाला निरोप देण्यात आले.
"गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या" घोषणा देत बाळगोपाळ यांनी या वर्षी चा गणेश उत्सव सोशल डिस्टन चे पालन करत तसेच मास्क, सॅनिटायझर चा वापर करत दहा दिवस गणपती बाप्पाची संकट मोचनआरती पूजन नित्यनेमाने करण्यात आले आहे.
बालगोपाल गणेश मंडळ विसर्जन साठी यावेळी कु.काजेल वाट्टमवार, कु.प्रगती पिन्नलवार, सानिका आवसेकर, गौवरी वट्टमवार, एकता ठाकुर, समिक्षा वट्टमवार, श्रावणी ठाकुर, श्रद्धा वट्टमवार, अस्मिता गोडसे, स्वरा वट्टमवार, वोवी वट्टमवार, विशाल वट्टमवार, श्रीतेज पिन्नलवार, यांच्या सह आदी उपस्थितीत होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा