आदिवासी आश्रम शाळेच्या अधीक्षक कर्मचारी यांना सातवा वेतन आयोग लागु करा

 अधीक्षक, शिक्षकोत्तर कर्मचारी संघटनेची सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

संपादक आशिष मुगटकर

निवेदन :- आदिवासी शाळेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अधीक्षक व महीला अधीक्षक यांना सातवा वेतनआयोग लागु करा याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडे अधीक्षक, शिक्षकोत्तर संघटनेने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

बारड/प्रतिनिधी

आदिवासी आश्रम शाळेत कार्यरत असलेल्या अधीक्षक, कर्मचारी वर्गाला सातव्या वेतन आयोगा पासून  वंचित ठेवले असून आदिवासी शाळेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अधीक्षक व महीला अधीक्षक यांना सातवा वेतनआयोग लागु करा याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या कडे अधीक्षक, शिक्षकोत्तर संघटनेने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

आदिवासी विकास विभाग अंतर्गत स्वयंसेवि संस्था मार्फत महाराष्ट्रातील विविध ठिकाणि आश्रम शाळा चालविले जात आहेत आदीवासी भागातील वास्त्यव्यास असलेल्या विध्यार्थीना २४ तास लक्ष देन्यासाठी एक जबाबदार आणि कर्त्यव्यदक्ष कर्मचारी म्हणूनअधिक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे . अशा एकनिष्ठ जबाबदार कर्मचार्याना २०१६ पासुन लागलेल्या सातव्या वेतन आयोगापासुन शासनाने वंचित ठेवल्यामुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे.

आदिवासी आश्रम शाळेत इयत्या पहीली ते दहावी वि, बारावी वि पर्यंत वर्ग चालू असुन त्यात ४०० ते ६०० विद्यार्थी शिक्षण घेतात. त्या सर्व विद्यार्थ्यांना रात्रदिवस पालण पोषणाची जबाबदारी अधिक्षक/अधिक्षिकेवर देन्यात आलेली आहे.परंतु अति महत्वाच्या घटकाला सातव्या वेतन आयोगापासुन वंचीत ठेवन्यात आलेले आहे. आदिवासी समाजाच्या उत्कर्षासाठी सेवा देन्या साठी गावापासुन दुर डोंगराळ पाळ्यामधे काम करनारा घटक अधिक्षक / अधिक्षिका असून शासनस्तरावर सातव्या वेतन आयोग लागु करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आला आहे परंतु अद्याप मागणी मान्यता मिळाली नसल्याने अधीक्षकावर अन्याय होत असल्याचे समोर आले आहे याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी अधीक्षकास सातवा वेतन आयोग लागु करुन देवून न्याय मिळवून द्यावा असे संघटनेच्या निवेदनावर नमूद करण्यात आले आहे.

यावेळीआदिवासी राज्य अनुदानित आश्रम शाळा अधिक्षक संघटनेचे विभागिय अध्यक्ष एम.डि. दर्शनवाड,सचिव एम.जी. इंगळे,जाधव, अशोक राठोड भंडारवाड ,जोशी , सागर सर, काळे , कातोरे , बोबडे , सय्यद आदी सह सदस्य उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या