माझी तब्येत उत्तम आहे ; तुम्ही सर्व काळजी घ्या.

 - जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर

संपादक आशिष मुगटकर

उपचार सुरू :- नांदेड चे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी साहेब डॉ.विपीन इटनकर  नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेताना

नांदेड/ प्रतिनिधी

नांदेड, दि १:- नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी साहेब डॉक्टर विपीन इटनकर यांना कोरोनाची लक्षणे आढळून आली.   नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील कोविड हॉस्पिटलमध्ये ते उपचार घेत आहेत. 

कोविड-१९ ची लक्षणे मला दिनांक ३० ऑगस्ट रोजी लक्षात आल्याबरोबर मी रितसर विनाविलंब तपासणी करुन घेतली. यापूर्वी आमच्या कार्यालयातील काही लोकांना कोविड-१९ ची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. यामुळे मी अधिक खबरदारी घेणे उचित समजून स्वत:हून आगोदर होम क्वारंटाइन झालो. काल सोमवार ३१ ऑगस्ट २०२० माझा अहवाल बाधित आल्याने आपल्या नांदेड जिल्हा रुग्णालयाच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.  "माझी प्रकृती स्थिर असून तुम्हा सर्वांच्या सदिच्छांच्या बळावर लवकरच यावर यशस्वी मात करून पुन्हा जोमाने काम सुरू करू" असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी व्यक्त केला आहे. 

कोविड हा संसर्गजन्य असल्याने जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी वारंवार हात धुणे, मास्क वापरणे व शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे अधिक महत्वाचे आहे. आपण सर्वजण योग्य ती काळजी घेऊन जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे. 

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड हॉस्पिटल कक्षातील डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या