राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांच्या हस्ते ध्वजारोहण.
बारड/ प्रतिनिधीला
मुदखेड तालुक्यातील आंबेगाव येथे साहित्यरत्न,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मुदखेड राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर यांच्या हस्ते अण्णा भाऊ साठे यांच्या हस्ते तैलचित्राचे पुजन व ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी गावातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यात वाटेगाव या लहान गावात झाला.
अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. तांत्रिक दृष्ट्या पूर्ण निरक्षर, अशिक्षित व्यक्ती, अश्या अण्णाभाउंनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचं श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीतं, पदं या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहिरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.
१९४४ ला त्यांनी `लाल बावटा` पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले. `माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काह्यली।।`ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाउंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र रशिया पर्यंत पोवाड्यातून सांगितले पुढे त्याचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्राध्यक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला.
अशा या साहीत्यसम्राट आण्णांची जयंती आज साजरी करण्यात आली. यावेळी आण्णांच्या तैलचित्राचे पुजन करण्याचे व ध्वजारोहन करण्याचे मोठे भाग्य लाभले असे शिप्परकर म्हनाले. यावेळी गावच्या सरपंच सौ.सावित्रीबाई वाघमारे, श्री रावसाहेब पाटील मुसळे,पोलीस पाटील देवबा जोंधळे, ग्रा.पं. सदस्य वामन जोंधळे, चांदराव पोतरे, साहेबराव जोंधळे, दिलीप जोंधळे, नामदेव कांबळे, साईनाथ शिंदे, काशिनाथ जोंधळे आदींची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा