पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा

 विविध विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांना दिल्या सुचना

आढावा बैठक : - मुदखेड नगर परिषदेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत विविध विकास कामांचा आढावा घेताना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब.


नांदेड/ प्रतिनिधी/ आशिष कल्याणे

दि.२३ ऑगस्ट  रोजी मुदखेड येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंञी तथा राज्यांचे सार्वजनिक बांधकाममंत्री  तथा नांदेडचे पालकमंञी मा. ना. अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीत नगरपालिका व ग्रामीण भागातील विविध विषयांवर तालुक्यातील सर्व कामांची आढावा बैठक घेऊन संबंधीत लोकांना कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी सूचना करण्यांत आल्या व नवीन कामे प्रस्तावित करणेसाठी माहिती घेऊन मार्गदर्शन करण्यांत आले. व तालुक्यातील पत्रकार मंडळींशी संवाद साधला!

    त्या प्रसंगी बैठकीस नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार, जि.प.सदस्य प्रतिनिधी भिमराव पा. कल्याने, नांदेड जिल्हा ओ.बि.सी. विभागाचे जिल्हाध्यक्ष रोहिदास जाधव, नगराध्यक्ष मुजीब अन्सारी, मुदखेड शहराध्यक्ष माधव कदम, उपसभापती आनंदराव गादीलवाड, माजी सभापती रत्नाकर शिंदे, तालुका काँग्रेस कमिटीचे सचिव रामराव खांडरे, डॉ. फुलवारे,जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष भुरेवार, भोकर विभागीय अधिकारी श्री. कंधारे साहेब, तहसीलदार दिनेशजी झापंले, सां.बा. विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. राजपुत, उपकार्यकारी अभियंता पाटील, गटविकास अधिकारी अनंत कदम, पोलीस निरीक्षक निकाळजे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी, सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्येकर्ते, सरपंच, सर्व पत्रकार, व तालुक्यातील प्रमुख कार्येकर्ते मोठया प्रमाणावर उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या