पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर साधला संवाद
बारड/ प्रतिनिधी
रेती माफीयावर वाळू चोरी प्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री आशोकराव चव्हाण यांनी मुदखेड येथील नगरपरिषद आढावा बैठकिसाठी आले असता पत्रकारांना बोलताना व्यक्त केले आहे.
यावेळी काँग्रेस कमेठी जिल्हाअध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नगरपरिषद नगराध्यक्ष मुझीप अन्सारी जागीरदार काँग्रेस तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार, शहराध्यक्ष माधव कदम, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, संजय कोलते, गंगाधर डांगे, मनोज कमटे,उत्तम हनमंते, अतिक अहेमद, ईश्वर पिन्नलवार, प्रल्हाद मस्के,नामदेव बिचेवार, सचिन कांबळे ,शेख ईरफान, शेख जब्बार, पिराजी गाडेकर, आशिष कल्याणे साहेबराव गागलवाड, नामदेव राहेरकर, साहेबराव हौसार आदीची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा बाबत आरोग्यविषयक बाबीवर तीस कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असून यामध्ये सिने टायझर ऑक्सिजन टॅंक, आरोग्य विषयक रुग्णालय सुविधा, मास्क पीपी किट, आरोग्यविषयक अत्याधुनिक सुविधा रुग्णांना मिळण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याची माहिती यावेळी दिली आहे.
यावेळी त्यांनी मुदखेड तालूक्यातील विकास कामाचा आढावा घेतला आहे तसेच नगर परिषदेच्या अडचणी जानुन घेतल्या आहेत तसेच कोरोना पार्श्वभूमी असताना मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे शहरात नऊ कोटींचा विकास निधी प्रक्रिया केला आहे.तर जिल्ह्यातील छोटे मोठे रस्ते जिल्हा मार्गाला जोडण्यात आले असून त्यांची विकास कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.तसेच तालुक्यातील संपूर्ण छोट्यामोठ्या पुलाची कामे पण मार्गी लावणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे .यावेळी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख यांनी मराठा आरक्षणा बाबतीत पुढील भुमिका कशी असेल याबाबत माहिती विचारली असता यासाठी आपण आरक्षण बाबतीत प्रयत्नशील असल्याची माहीती चव्हाण यांनी दिली आहे. यावेळी तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांना वसाहत निर्मिती करून देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होण्यासाठी रिजर्व बँकेच्या नियमाचे पालन बँकेचे अधिकारी करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.तर सततच्या पडणाऱ्या पावसाने शेतकर्यानंच्या नुसकानीचे पंचनामे करण्यात येणार असून त्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यावेळी साहेबराव गागलवाड,नामदेव राहेरकर,साहेबराव हौसारे, आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी काँग्रेस कमेठी जिल्हाअध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नगरपरिषद नगराध्यक्ष मुझीप अन्सारी जागीरदार काँग्रेस तालुकाध्यक्ष उद्धवराव पवार, शहराध्यक्ष माधव कदम, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, संजय कोलते, गंगाधर डांगे, मनोज कमटे,उत्तम हनमंते, अतिक अहेमद, ईश्वर पिन्नलवार, प्रल्हाद मस्के,नामदेव बिचेवार, सचिन कांबळे ,शेख ईरफान, शेख जब्बार, पिराजी गाडेकर, आशिष कल्याणे साहेबराव गागलवाड, नामदेव राहेरकर, साहेबराव हौसार आदीची प्रमुख उपस्थिती होती.
| भाजप सरकारच्या मागील पाच वर्षात जिल्ह्यतील संपूर्ण यंत्रणेसह अधिकारी राजकीय हस्तक्षेप करत होते. रेती माफीयांन कडून रेती चोरी मोठ्या प्रमाणात केली जात होती. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला रेती गाडी पन्नास हजार पर्यंत विकत घेण्याची वेळ आली असल्याने याबाबत स्वता लक्ष घालून रेती चोरी करणाऱ्या रेती माफीयावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. |
कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा बाबत आरोग्यविषयक बाबीवर तीस कोटीचा निधी उपलब्ध करून दिला असून यामध्ये सिने टायझर ऑक्सिजन टॅंक, आरोग्य विषयक रुग्णालय सुविधा, मास्क पीपी किट, आरोग्यविषयक अत्याधुनिक सुविधा रुग्णांना मिळण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याची माहिती यावेळी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा