पालकमंत्र्यांच्या मुदखेड दौऱ्यामुळे मुगट शाळेसमोरील घाण साफ

 संपादक आशिष मुगटकर

घाणीचे साम्राज्य :- मुगट येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या जिल्हा परिषद शाळे समोर घाण व केरकचरा ढीग.

 मुदखेड / तालुका प्रतिनिधी

मुदखेड तालुक्यातील मुगट येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या मुगट जिल्हा परिषद शाळेच्या समोर गेल्या अनेक दिवसापासून घाणीचे साम्राज्य व केर कचऱ्याचे ढीग वाढले होते पण अचानक रात्री ही घाण व केअर कचऱ्याचे ढीग अचानक गायब झाल्यामुळे रविवारी सकाळी रस्त्याने फिरणाऱ्या नागरिक मोठ्या कुतुहलाने याकडे पाहू लागली होती याचे कारण ही असेच आहे.हे साफ करण्याचे कारण ठरले नांदेड चे पालकमंत्री अशोकराव चव्हाण.

घाण साफ :- मुगट येथील शाळे समोर रातोरात घाण व केरकचरा मध्यरात्रीला साफ करण्यात आला.

 रविवारी पालकमंत्री मुदखेड दौऱ्यावर येत असल्यामुळे या मुख्य रस्त्यावरील व शाळेसमोरील घाण व केरकचरा मध्यरात्रीला साफ करण्यात आला. उशिरा का होईना पण ग्रामपंचायतला जाग आल्यामुळे शिक्षण प्रेमी आनंदी झाले आहेत.ग्रामपंचायत व शाळेने शाळेच्या समोर केरकचरा टाकल्यावर नियंत्रण आणण्यासाठी म्हणून शाळेच्या समोर कॅमेरे बसवण्यात आली पण या शाळेसमोर केरकचरा टाकणाऱ्या वर शाळा प्रशासन व ग्रामपंचायत ही कुचकामी ठरली आहे. त्यामुळे या केर कचरा टाकणाऱ्या चे मनोबल दिवसेंदिवस वाढतच जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी घाण ही होतच आहे पण पालकमंत्र्यांच्या मुदखेड दौर्‍यामुळे शाळेसमोरील पावसाळ्यात ही घाण साफ केल्यामुळे शाळे समोरील परिसर हा स्वच्छ दिसत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या