![]() |
| दुर्मिळ ब्रम्हकमळ :- जिल्हा काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे यांच्या निवासस्थानी उमलले दुर्मिळ ब्रम्हकमळ यावेळी पांडागळे परिवाराने विधीवत पुजा करत ब्रम्ह कमळ महादेवाच्या पिंडीवर अर्पण केले आहे. |
बारड/प्रतिनिधी
जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांच्या तरोडा बुद्रुक परिसरातील लक्ष्मीनारायण नगर भागातील निवासस्थानी दुर्मिळ असे समजले जाणारे ब्रम्हकमळ उमळले आहे.हे फुल फक्त वर्षातून एक रात्र उमलते हिमालय आणि उत्तराखंड च्या जंगलात हे मनोहारी ब्रम्ह कमळ प्रामुख्याने आढळते. या भागात जाणारे असंख्य भाविक ब्रम्हाकमळ दीसले तर आपली यात्रा सफल झाली असे मानतात देवभूमी मानल्या जाणाऱ्या उत्तराखंड राज्याने या फुलाला राष्ट्रीय फुलाचा दर्जा दिला आहे संतोष पांडागळे यांच्या छोटेखानी बागेत हे दुर्मिळ कमळ उमलले पांडागळे यांनी सहपरिवार विधीवत पुजा करुन रात्री महादेवाच्या पिंडीवर अर्पण केले.ब्रम्ह कमळाच्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होते अशी आख्यायिका आहे. कोरोना नियमाचे पालन करत विधीवत पुजा करुन ब्रम्ह कमळाचे स्वागत केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा