कोरोनामुळे या वर्षीचे कार्यक्रम रद्द केल्याची कमेटीची घोषणा !
Editar MN Ashishkalyane
मुदखेड /प्रतिनिधी /अतिक अहेमद
मुदखेड येथील भोकर रोडवर असलेल्या गैबी पीर बाबा दर्गा याठिकाणी दरवर्षीप्रमाणे होणारा संदल कार्यक्रम आणि उत्सव यावर्षी चा १८ ऑगस्ट रोजी होणार होता तो रद्द करण्याचा निर्णय गैबीपीर बाबा दर्गा कमिटीने घेतला आहे.
मुदखेड तालुक्यात गैबीपीर बाबा दर्गा हा जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. याठिकाणी तेलंगाना आणि तसेच मराठवाड्यातून मुस्लिम व हिंदू भक्त गैबीपीर बाबाच्या संदल साठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. पोळ्याच्या दिवशी संदल मिरवणूक शहरातील गुजरी येथून निघूण भोकर रोड स्थित गैबीपीर बाबा दर्गा या नियोजीत स्थळी पोहचायचा आणी दुसऱ्या दिवशी दर्गा परिसरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात परंतु कोरोनाच्या दिवसेनदिवस वाढत्या प्रभावामुळे दिनांक १८ ऑगस्ट रोजी होणारा संदल यात्रा रद्द करण्यात आल्याचे दर्गा कमिटी अध्यक्ष मन्नान चौधरी, दर्गाचे मुजावर पुजारी शेख रशीद शेख ईमाम, अब्दुल आजिस, शेख पाशा, शेख नफिस, शेख जमील, शेख जिल्हानी, महंमद नवाज म.हसेन, म.आजीम अ. मन्नान, यांच्या सह अदि ने हा सदल रद्द करण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
मुदखेड येथील गैबीपीर बाबांच्या दर्गा संदल कार्यक्रम आणि उत्सव यात्रा उत्सव हा रद्द करण्यात आला असून भक्तांनी याची नोंद घ्यावी अशी माहिती दर्गा कमेटीने घेतला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा