शिवसेनीकांनी केला कर्नाटक भाजप सरकारचा जाहीर निषेध.
नांदेड /प्रतिनिधी /आशिष कल्याणे
कर्नाटक सरकारने राजे छञपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटविल्याच्या निषेधार्थ मुदखेड तालुक्यातील शिवसेनेच्या वतीने कर्नाटकचे मुख्यमंत्री येडुरप्पा यांचा पुतळा दहन करून कर्नाटक सरकारचा मुदखेड तालुका शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी चौक मुदखेड येथे जाहीर निषेध करण्यात आला. भाजपा वाल्याना छञपती शिवाजी महाराज यांच्या बदल किती पुळका आहे ते शिव प्रेमीना समजलं आहे. असे मत अनेक शिवसेनीक व्यक्त करत होते.
मुदखेड शिवसेना तालुका प्रमुख संजय पाटील कुरे,यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर व तालुक्याच्या वतीने भोकर विधानसभा शिवसेना नेते बाळासाहेब देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले यावेळी ता.प्रमुख संजय पा.करे ,भोकर विधानसभा शिवसेना नेते बाळासाहेब देशमुख बारडकर, मुदखेड शिवसेना शहर प्रमुख सचिन चंदे, सचिन माने पाटिल, उप तालुका प्रमुख गोविंदराव शिंदे पा ,तालुका संघटक माणिक लोमटे,शहर सघंटक सुधाकर सुर्यवंशी, कृ.ऊ.बा.समितीचे संचालक सरेश शेटे, साहेबराव चेव्हान, संजय पाटील गाढे, दिपक पा.डोंगरगावकर ,माधव खांडरे, गजानन कत्रे ,किशन खतगावे, फालाजी पा पवार, सोनु आरेपल्लु,राजेश पा.काळे,दामाजी पवार, व अन्य शिवसैनिक आदी जन उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा