मुदखेड कोविड सेंटर येथील १० रुग्ण कोरोना मुक्त.

 रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी गुलाबपुष्प देऊन स्वागत.

Editar MN Ashishkalyane

रूग्णांचे स्वागत :- कोरोना मुक्त रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले .

बारड/प्रतिनिधी

मुदखेड कोविड सेंटर येथील १० रुग्ण कोरोना मुक्त करुन डिस्चार्ज देण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. कपिल जाधव यांनी यावेळी दीली आहे.यावेळी कोरोना मुक्त रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले आहे.

मुदखेड कोरोना केअर सेंटर  येथे १० रुग्णांना उपचारांती घरी सुखरूप सोडण्यात आले असुन मुदखेड येथील दुर्गानगर मधील महिला जिचा वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे मृत्यु झाला होता तिच्या संपर्कातील व्यक्तीच्या तपासणी साखळीतील १० व्यक्तींना पुढील १४ दिवस होम क्याँरंन्टाईन राहण्याच्या सूचना देऊन सुट्टी देण्यात आले आहे.

दि.९ ऑगस्ट रोजी कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना मुदखेडचे तहसीलदार दिनेश झांपले यांनी रुग्णांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे.

यावेळी मुदखेड ग्रामीण रुग्णालयचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कपिल जाधव ,वैद्यकीय अधिकारी डॉ संजय कदम ,डॉ हिरेश हामंद, डॉ मोहित नागडा, अमोल कोकरे ब्रदर ,संदीप ब्रदर ,रणजित हाटकर, मोह अफसर, आलिम गुलाम रसूल यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते.आतापर्यंत मुदखेड कोरोना केअर सेंटर येथे ९३ संशयित व्यक्तीची कोविड तपासणी करण्यात आली असून यात २५ व्यक्तीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यापैकी १५ रुग्णांना कोरोना केअर सेंटर  येथून सुखरूप घरी पाठविण्यात आले आहे . २ रुग्णांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे संदर्भीत कऱण्यात आले होते तेथून त्यांची ही सुखरूप सुट्टी झाली आहे.

सध्या मुदखेड कोरोना केअर सेंटर येथे ८ पॉझिटिव्ह रूग्ण उपचार घेत आहेत त्यांची प्रकुर्ती स्थिर आहे तसेच ३ संशयित रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भीत करण्यात आले आहे. त्या पैकी २ रुग्ण शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे व १ रुग्ण गुरूगोविंदसिंह शासकीय रुग्णालय नांदेड उपचार घेत आहे.अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय मुदखेड डॉ कपिल जाधव यांनी यावेळी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय बातम्या